आमदार नीलेश लंके Saam Tv
महाराष्ट्र

लंके म्हणाले, कर्जत-जामखेडची जनता भाग्यवान

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

अहमदनगर: आमदार रोहित पवार यांच्यासारखे सर्वगुणसंपन्न नेतृत्व लाभल्यामुळे कर्जत- जामखेडची जनता भाग्यवान आहे, असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले.

रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोंभळी (ता. कर्जत) येथे आयोजित रक्तदान शिबिरात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य गुलाब तनपुरे, समाजकल्याण समिती सभापती उमेश परहर, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे, अमृत लिंगडे, प्रवीण तापकीर, संदीप गांगर्डे, संजय अनभुले, डॉ. सुनील मुळे, दीपक नन्नवरे, रवींद्र महारनवर, सचिन दरेकर, महेश काळे, अमोल थेटे, सागर गंगावणे उपस्थित होते.

लंके म्हणाले, की रक्तदान शिबिर आयोजनाचा हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. सर्वांनी रक्तदान केले पाहिजे. आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून या मतदारसंघातील लोकांना एक अभ्यासू, समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ असणारे, सर्वगुणसंपन्न नेतृत्व मिळाले आहे. यामुळे येथील जनता भाग्यवान आहे. खांद्याला खांदा लावून काम करणारे सहकारी पवार यांना लाभले आहेत. येथील स्थानिक कार्यकर्त्यांची मोलाची साथ आमदारांना मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT