नारंगी ग्रामस्थ पीत आहेत गढूळ पाणी; ग्रामस्थांना जडल्या चर्मरोगाच्या व्याधी राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

नारंगी ग्रामस्थ पीत आहेत गढूळ पाणी; ग्रामस्थांना जडल्या चर्मरोगाच्या व्याधी

त्यामुळे लवकरच नारंगीतील दूषित पाणी समस्या सुटली जाईल अशी आशा निर्माण झाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

राजेश भोस्तेकर

रायगड: खालापूर तालुक्यातील नारंगी ग्रामपंचायती हद्दीतील महिला ग्रामस्थांनी 15 वर्षांपासून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि चर्म रोगाच्या व्याधीने त्रस्त होऊन गावातील दूषित पाणी समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाच गाऱ्हाणे घातले आहे. डोणवत धरणातून पाणी पुरवठा योजना सहा महिन्यात कार्यन्वित केली जाणार असल्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील यांनी महिला ग्रामस्थांना दिले आहे. त्याचबरोबर बीडीओ यांना गावात जाऊन पाहणी करण्याचे आदेशही दिले आहेत. त्यामुळे लवकरच नारंगीतील दूषित पाणी समस्या सुटली जाईल अशी आशा निर्माण झाली आहे.

खालापूर तालुक्यातील नारंगी ग्रामपंचायत हद्दीत दलित वस्ती, आदिवासी वाडी, नवीन वसाहत यामधील साधारण 400 ग्रामस्थांना नदीच्या पाण्यावरून अशुद्ध पाणी पुरवठा केला जातो. मात्र ग्रामस्थांना दिले जात असलेले नदीचे पाणी हे मातिमिश्रित, केमिकलयुक्त दूषित आहे. नारंगी ग्रामस्थांची गेली पंधरा वर्षांपासून ही समस्या आहे. वारंवार ग्रामपंचायत प्रशासनाला सांगूनही ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या ठिम्म कारभारामुळे केमिकल आणि मतिमिश्रित पाणी पिऊन गावातील महिला, लहान मुले, पुरुष मंडळींना चर्मरोगाची व्याधी जडली आहे.अशुद्ध पाणी येत असल्याने बाहेरून विकतचे पाणी आणावे लागत आहे. अखेर गावातील महिलांनी पुढाकार घेऊन अलिबाग येथे राजीप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील याचे कार्यालय गाठले. या महिलांनी बाटलीतून सोबत आणलेले दूषित पाणीही पाटील यांना दाखविले.

नारंगी गावासाठी 1 कोटी 38 लाखाची पाणी योजना मंजूर झाली असून डोणवत धरणातून शुद्ध पाणी पुरवठा सहा महिन्यात केला जाणार असल्याचे डॉ किरण पाटील यांनी महिला ग्रामस्थांना सांगितले. बीडीओ यांनाही गावात जाऊन तपासणी करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. त्यामुळे आता तरी नारंगी ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळण्याची आशा निर्माण झाली होती. सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांनी गावातील नागरिकांच्या मूलभूत गरजा भागविणे गरजेचे असतानाही आपल्या पदाचा गैरवापर करून नागरिकांना वेठीस धरले जात आहे. त्यामुळेच अखेर या ग्रामस्थांना अधिकाऱ्याकडे धाव घ्यावी लागली आहे. जिल्ह्यात अनेक भागात पाणी समस्या आहेत. मात्र तेथील ग्रामस्थांची समस्या कधी सुटणार हा एक प्रश्न गेली अनेक वर्ष अधांतरीत आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Railways: भारतातील ही 3 स्टेशनं मानली जातात सर्वात घाणेरडी, पाहा तुमच्या जवळचं स्टेशन आहे का यादीत?

NCMC Card : आजपासून नियम बदलला! 'या' महिलांचा अर्ध्या तिकिटाचा प्रवास बंद; घ्यावे लागणार पूर्ण तिकीट, वाचा सविस्तर

Chutney For Cholesterol: नसांमध्ये घाणेरड्या कोलेस्ट्रॉलचा थर साचतोय? रोजच्या आहारात फक्त 'ही' एक चटणी खा

Maharashtra News Live Update: मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य प्रकरणी गुन्हा दाखल

Black Salt Water Benefits: पाण्यात काळे मीठ टाकून प्यायल्यास शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT