Mahavitaran News Saam Tv
महाराष्ट्र

Palghar News: महावितरणाचा भोंगळ कारभार! घरात 3 बल्ब,1 फॅन अन् वीज बिल मात्र लाखोंचं

अचानक वीज बिल लाखोंच्या घरात आल्याने ग्राहक आश्चर्य व्यक्त करत आहेत .

रुपेश पाटील

Palghar News : पालघर (Palghar) मधील वीज महावितरण विभागाचा भोंगळ आणि मनमानी कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. डहाणूतील धानीवरी कोठबीपाडा येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना वीज महावितरण विभागाने एका महिन्याच एक लाख 29 हजार बिल दिल आहे. वार्षिक उत्पन्न 20 हजार रुपयांच्या जवळपास असलेल्या गायकर कुटुंबाला अचानक लाखोंच्या घरात बिल (Electricity Bill) आल्याने सध्या येथील वीज ग्राहक आश्चर्य व्यक्त करत आहेत. (Palghar Latest News)

डहाणूतील धानीवरी कोठबीपाडा येथील अजीत बाबू गायकर यांच्या मालकीचं एक घर आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून शासनाने घरकुल योजनेचा लाभ दिला. त्यामुळे घरात अवघे तीन बल्ब आणि एक फॅन इतकाच विजेचा वापर. गायकर कुटुंबाला मागील अनेक महिन्यांपासून 300 ते 600 च्या घरात विज बिल येत होतं.

कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची असताना देखील गायकर कुटुंबीय मागील अनेक महिन्यांपासून या वीज बिलाचा नियमित भरणा करत होते. मात्र सप्टेंबर महिन्याच वीज बिल या कुटुंबाला तब्बल एक लाख 29 हजार रुपयांच्या घरात आलं आहे. त्यामुळे या वीज बिलाचा भरणा करायचा कसा असा गंभीर प्रश्न गायकर कुटुंबासमोर उभा राहिला आहे.

तीन बल्ब आणि एका फॅन शिवाय घरात विजेवर चालणार टीव्ही, फ्रिज असं कोणतंही उपकरण नाही . मात्र असं असताना देखील लाखोंच्या घरात आलेल्या बिलामुळे गायकर कुटुंबाची झोप उडाली आहे . वीज महावितरण विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता उडवाउडवी ची उत्तर देऊन हे बिल तुम्हाला भरणा करावाच लागेल असा सज्जड दम दिला जात असल्याचा आरोप गायकर कुटुंबाकडून करण्यात येतोय.

डहाणूतील धानिवरी कोठबीपाडा येथील अजिस गायकर हे एकटे वीज महावितरण विभागाच्या भोंगळ कारभाराने त्रस्त नाहीयेत . या पाड्यातील 20 पेक्षा अधिक कुटुंब सध्या याच विज बिलाच्या चिंतेत आहेत . यापैकी अनेक कुटुंबांची नाव दारिद्र्यरेषे खाली असून या घरांमधील विजेचा वापर अत्यंत कमी आहे . महिन्याच्या अखेरीस येणारं 400 , 500 , 600 रुपयांच वीज बिल येथील वीज ग्राहक नियमितपणे भरणा करतात .

मात्र तरी देखील येथील अनेक वीज ग्राहकांना 26 हजार , 61हजार ,75 हजार तर काहीना थेट दीड लाखापर्यंत विज बिल देण्यात आल आहे . हे वीज बिल न भरल्यास घरांवर लावलेले वीज महावितरण विभागाचे मीटर काढून नेण्यात येईल असा इशारा या वीज ग्राहकांना महावितरण कडून देण्यात येतोय . त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून हे वीज ग्राहक आपल्या खिशातील 400 ते 500 रुपये खर्च करून रोज वीज महावितरण विभागाच्या कार्यालयात खेटे मारतात मात्र तरी देखील यांना अपेक्षित उत्तर मिळत नाहीये .

वीज महावितरण विभागाच्या भोंगळ कारभारा विरोधात आपल्याला नेहमीच वीज ग्राहकांचा आक्रोश पाहायला मिळतो. याच वीज महावितरण विभागाच्या अनोगोंदी कारभाराचा ग्रामीण भागातील वीज ग्राहकांनाही मोठा फटका बसतोय.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

SCROLL FOR NEXT