Palgahr Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Palghar Crime : धक्कादायक! प्रेयसी भेटायला येईना, प्रियकरानं केलं हादरवणारं कृत्य

अपहरणकर्ता आरोपी हा युट्युबर

रुपेश पाटील

Palgahr Crime : प्रेयसी सोबत राहत नसल्याचा व संबंध ठेवत नसल्याचा राग मनात धरत प्रियकराने धक्कादायक कृत्य केल्याची घटना पालघर येथे घडली आहे. प्रियकराने प्रेयसीच्या मोठ्या बहिणीच्या मुलाचे शाळेतून अपहरण केले. त्यानंतर रोख रक्कमेची व प्रेयशीच्या बहिणीकडे प्रेयसीला घरी पाठविण्याची मागणी केली. याप्रकरणी अपहरण करणाऱ्या आरोपीस अटक करून तलासरी पोलिसांनी अवघ्या काही तासात अपहरण झालेल्या मुलाची सुखरूप सुटका केली.

विशेष म्हणजे अपहरणकर्ता हा आरोपी युट्युबर आणि आदिवासी सिंगर असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. राजेश धोदडे असे आरोपीचे नाव असून फिर्यादी महिलेच्या बहिणी सोबत त्याचे गेल्या 4 वर्षांपासून प्रेम संबंध होते. परंतु चार वर्षांपासून संबंध असून प्रियसी लग्नास चालढकल करत होती. तसेच प्रियकराशी संबंध न ठेवण्यास प्रेयसीची बहीण भाग पाडत होती.

याचाच राग मनात धरत प्रियकराने प्रेयसीच्या मोठ्या बहिणीच्या 8 वर्षीय मुलाचे सोमवारी 9 जानेवारी रोजी शाळा भरण्यापूर्वी अपहरण केले. तलासरी पोलीसांनी सदर घटनेची माहिती मिळताच तातडीने दोन टीम तयार करत संशयित आरोपीचे फोन लोकेशन्स व इतर माहितीच्या आधारे तपास करत आरोपीस चारोटी येथून अटक केली.

तर आरोपीच्या माहिती वरून अपहरण झालेल्या मुलाला केंद्र शासित प्रदेश सेलवास खानवेल येथून यशस्वी रित्या ताब्यात घेत सुटका करून आईच्या स्वाधीन केले. याबाबत तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळीआधी पगार मिळणार की नाही? एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर मंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय

जेवताना घाई करण्याची सवय तुम्हाला आणू शकते मोठ्या संकटात; पोटाचे आरोग्य बिघडवण्यापूर्वी नक्की जाणून घ्या सत्य

Plank Benefits: खरचं वजन कमी करायचं आहे? मग सुरुवात करा 'या' व्यायामाने, मिळेल पॉझिटिव्ह बदल

Parenting Alert : लहान मुलांच्या घशात काही अडकलं तर सर्वात आधी काय करावे? प्रत्येक पालकाला माहित असाव्यात 'या' २ महत्त्वाच्या गोष्टी

EPFO : खासगी नोकरदारांसाठी गुड न्यूज! जास्त पेन्शनचा मार्ग मोकळा? हायकोर्टाने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT