भाजयुमोचे अभिनव आंदोलन; रस्त्यावरील खड्ड्यात बसून केले भजन संजय राठोड
महाराष्ट्र

भाजयुमोचे अभिनव आंदोलन; रस्त्यावरील खड्ड्यात बसून केले भजन

सार्वजनिक बांधकाम विभागाला जागे करण्यासाठी भाजयुमोचे पदाधिकारी शुभम गोरे यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावरील खड्ड्यात बसून अभिनव आंदोलन करण्यात आलंय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड

यवतमाळ - जिल्ह्यातील वणी तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झालीय. नागरिकांच्या संयमाचा बांध कधीही फुटू शकतो. पुरड ते वेळाबाई हा रस्ता खड्डेमय झाला आहे. वारंवार दिलेल्या निवेदनाला केराची टोपली दाखवण्याऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाला PWD जागे करण्यासाठी भाजयुमोचे BJMY पदाधिकारी शुभम गोरे shubham gore यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावरील खड्ड्यात बसून अभिनव आंदोलन innovative protest करण्यात आलंय.

हे देखील पहा -

शासन धनदांडग्याच्या दावणीला बांधल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. पुरड ते वेळाबाई हा मार्ग चक्क यम सदनाचा दरवाजा ठोठावतोय. यामुळे प्रशासनाची कार्यप्रणाली चव्हाट्यावर येत आहे. बांधकाम विभाग निद्रिस्त आहे. तालुक्यामधील रस्त्याचे नवनिर्माण तात्काळ करावे या करिता चक्क खड्यात 'भजन' hymn करण्यात आले. रस्त्याची बिकटस्थिती वाहन चालकांना सातत्याने आव्हान देत असून लहानसहान अपघात नित्याचेच आहे.

शासनदप्तरी याची नोंद नाही परंतु प्रशासन एवढे निर्ढावलेत कसे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत केल्या जात आहे. गेल्या दोन वर्षा पासून या मार्गाची डागडुजी सुध्दा करण्याची धाडस बांधकाम विभागाने दाखवली नाही, परिसरातील नागरिकांचा संताप वाढतोय, उद्रेक होण्यापूर्वी किमान या मार्गाची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri: काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत बुडून एकाच कुटुंबातील ४ मुलांचा मृत्यू

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लॅन; रवींद्र चव्हाण मैदानात!

YouTuber Dhruv Rathee: यूट्युबर ध्रुव राठींची 20 तासांनंतर सुटका; राठींचा पोलिसांवर गंभीर आरोप

Tukaram Mundhe: MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आयुक्त तुकाराम मुंढेंवर सरकार सोपवणार नवी जबाबदारी

भाजपच्या तीन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; काय आहे कारण? BJPच्या कारवाईनं राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT