आंदाेलनांच्या पार्श्वभुमीवर साता-यात पाेलिसांची फाैज दाखल

satara
satara
Published On
Summary

सामान्य लोकांचा विचार न करता लॉकडाउन योग्य नाही. त्यामुळे लॉकडाउन रद्द करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कऱ्हाड तालुका दक्ष नागरिक संघानेही दिला आहे.

सातारा : काेराेना बाधितांची covid 19 patients वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन सातारा जिल्हा प्रशासनाने संपुर्ण सातारा जिल्हा पुन्हा लाॅकडाउन lockdown केलेला आहे. जिल्ह्यात केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरु ठेवण्याचे आदेश केल्याने अन्य व्यावसायिकांत नाराजी पसरली आहे. परिणामी जिल्ह्यातील विविध तालुक्यांत लाॅक़डाउन हटवा यासाठी व्यापा-यांच्या बैठका हाेत आहेत. आज (मंगळवार) सातारा शहरात व्यापारी वर्गाच्या वतीने मूक आंदाेलन हाेण्याची शक्यता आहे. या आंदाेलनाची हाक समाज माध्यमातून देण्यात आली आहे. दरम्यान आज 12 आमदारांच्या निलंबनावरुन भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदाेलन हाेणार असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे. या सर्व घडामाेडीत कायदा व सुव्यस्था अबाधित राहावी यासाठी सातारा पाेलिस दल सज्ज झाले आहे. (satara-lockdown-news-traders-bjp-mla-agitation-police)

सातारा जिल्ह्यातील लाॅकडाउन हटवा अशी मागणी जाेर धरु लागली आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी रविवारी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हवं तर विकेंड लाॅकडाउन कडक करा परंतु नियमीत लाॅकडाउन हटवा अशी मागणी केली. याबराेबरच महाबळेश्वर येथील व्यावसायिकांनी तसेच विविध संघटनांनी लाॅकडाउन हटला नाही तर येत्या शुक्रवारी (ता.9) सर्व महाबळेश्वरातील दुकाने सुरु करु असा इशारा दिला आहे.

satara
निष्ठुरतेचा कळस; बैलाची पाय तोडून,फास लावून हत्या

दरम्यान लॉकडाऊन हटवा व्यापार्‍यांना वाचवा, न्याय द्या, अशा मागण्या करत क-हाड शहरातील छोट्या दुकानदारांनी फलक व घोषणा देत लॉकडाउनच्या विरोधात साेमवारी भुमिका घेतली. व्यापाऱ्यांनी येथील तहसीलदार कार्यालयाबाहेर निदर्शनेही केली. त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदार अमरदीप वाकडे यांना दिले. त्यांनतर व्यापा-यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनाही निवेदन दिले. व्यापार्‍यांच्या भूमिकेला मनसेनेही पाठिंबा दिला.

जिल्ह्यात पुन्हा लॉकडाउन केला आहे. दोन जुलैपर्यंत कृष्णा कारखाना निवडणुक सुरू होती, हजारोच्या संख्येने लोक रस्त्यावर होते. त्यावेळी आपण लक्ष दिले नाही आणि निवडणुक संपली की लगेच लॉकडाउन केले. ही सामान्यांवर अन्याय करणारी गाेष्ट आहे. सामान्यांनी जगायचे तरी कसे, हाच खरा प्रश्न आहे. कामधंदा नाही, महागाई वाढते आहे. कर्जाचे हप्ते, दुकानांचे भाडे, घर खर्च टाळता येत नाही. त्यात वीज बिल, शासकीय कर आहेत. त्यामुळे त्याचे नियोजन करताना अवघड होते आहे. लॉकडाउन लावून आत्महत्या करण्यापेक्षा कोरोनाने मेलेलं बरं अशी आमची अवस्था झाली आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान आजच्या वेगवेगळ्या आंदाेलनाच्या पार्श्वभुमीवर पाेलिस दल सज्ज झाले आहे. आज सकाळी माेती चाैकात पाेलिस फाटा जमला हाेता. प्रत्येकास वरिष्ठ अधिका-यांना सूचना दिल्या. त्यानंतर पाेलिस कर्मचारी त्यांच्या नियुक्त ठिकाणी रवाना झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com