Monsoon Session :अखेर कृषी कायदा विरोधातील ठराव सरकारने मांडलाच नाही Saam tv
महाराष्ट्र

Monsoon Session :अखेर कृषी कायदा विरोधातील ठराव सरकारने मांडलाच नाही

केंद्र सरकारने लागू केलेले कृषी कायदे शेतकऱ्यांना अडचणीत आणणारे असून या कायद्यांमध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात (Central Agricultural Act) दिल्लीच्या सीमेवर गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. याचे पडसाद आता राज्याच्या पावसाळी अधिवेशनातही उमटल्याचे दिसून आले. केंद्रीय कृषि कायद्यात बदल आणि सुधारणा (Changes and improvements) करण्यासाठी राज्यातील नागरिकांकडून सल्ले मागविण्यात आले आहेत. काँग्रेसचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (balasaheb Thorat) यांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी यासंदर्भात सभागृहात माहिती दिली. (The government has not introduced a resolution against the Agriculture Act)

केंद्र सरकारने लागू केलेले कृषी कायदे शेतकऱ्यांना अडचणीत आणणारे असून या कायद्यांमध्ये सुधारणा होणे गरजेचे असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सुचवले. या सुधारणा आणि बदल करण्यासाठी या कायद्यांना आक्षेप असणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या प्रतिक्रिया आणि सल्ले राज्यसरकारने मागवले आहेत. कृषि कायद्यातील बदल आणि सुधारणांसाठी जनतेला दोन महिन्यांचा कालावधी दिल जाईल. या दोन महिन्यांमध्ये आपण या जनतेने कृषी कायद्यांसंदर्भात आपले सल्ले आणि सुधारणांची माहिती राज्यपर्यन्त पोहचवायाची आहे. त्यानंतर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी कृषि कायद्यातील बदल आणि सुधारणांसंबंधी लोकांकडून सल्ले मागवण्यासंदर्भात समर्थन देत हा ठराव मांडण्यात आल्याची माहिती सभागृहाला दिली.

दरम्यान, केंद्र सरकारच्या कृषी धोरणाविरोधात शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर या कृषी कायद्यांना नापसंती दर्शविणारा ठराव अधिवेशनात करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, एकीकडे, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात ठराव करण्याची मागणी अखिल भारतीय किसान संघर्ष समितीने केली होती. तर दुसरीकडे केंद्रीय कृषी कायद्यांबाबत विरोधाचा ठराव न करता यात काही सुधारणा करून विधेयक मंजूर केल्यास महाविकास आघाडी सरकारच्या विरोधातही रस्त्यावर उतरण्याचा इशारा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर अधिवेशनात हे विधेयक न मांडण्यात आले नाही. आता हे विधेयक हिवाळी अधिवेशनामध्ये मांडलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Cancer: नखांच्या कॅन्सरची सुरूवातीची लक्षणं कोणती? वेळीच व्हा सावध

Government Schemes : नवरात्रीत नवी मुंबई महापालिकेनं नागरिकांसाठी घेतला मोठा निर्णय, सुरू केल्या ४६ कल्याणकारी योजना

Death News : शिवसेनेचे विधानसभा संघटक प्रशांत काळे यांचे निधन, कल्याणमध्ये राजकीय वर्तुळात शोककळा

Main Door Vastu Tips For Navratri: नवरात्रीत घराच्या मुख्य दरवाजावर लावा ‘या’ 5 शुभ वस्तू; घरात येईल सुख-समृद्धी!

इंडिया आघाडीला मोठा धक्का! भाजपनं काँग्रेसच्या मित्रपक्षाचे 3 आमदार फोडले

SCROLL FOR NEXT