कोर्टाने बंदी उठवल्यानंतरची पहिली बैलगाडा शर्यत सांगलीमध्ये; शर्यतीसाठी 26 नियम व अटी Saam TV
महाराष्ट्र

कोर्टाने बंदी उठवल्यानंतरची पहिली बैलगाडा शर्यत सांगलीमध्ये; शर्यतीसाठी 26 नियम व अटी

जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व नियम पाळून बैलगाडी शर्यत भरवण्याचे परवानगी पत्र दिले असून या शर्यतीसाठी एकूण 26 नियम आणि अटी पाळून बैलगाडी शर्यत घेण्यास आयोजकांना परवानगी दिली आहे.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : महाराष्ट्रतील पहिल्या बैलगाडी शर्यतीला (Bullock cart race) सांगली जिल्ह्यात (Sangli) अधिकृतरित्या परवानगी मिळाली आहे. सुप्रीम कोर्टाने बैलगाडी  शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर पहिल्या बैलगाडी शर्यतीला सांगली जिल्ह्यात परवानगी मिळाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व नियम पाळून बैलगाडी शर्यत भरवण्याचे परवानगी पत्र दिले असून या शर्यतीसाठी एकूण 26 नियम आणि अटी पाळून बैलगाडी शर्यत घेण्यास आयोजकांना परवानगी दिली आहे.

कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे गावी 4 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता बैलगाडी शर्यत आयोजित करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दिल्ली येथील शेतकरी आंदोलनातील संदीप गिड्डे (Sandeep Gidde) यांच्या पुढाकारातून या शर्यती होणार आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुरुंगवास टळला, पण शिक्षा कायम; माणिकराव कोकाटेंना न्यायालयाचा दिलासा की झटका? कोर्टात काय घडलं?

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटेंना 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर

Winter Hair Care Tips: हिवाळ्यात केसांना तेल कधी लावावे? जाणून घ्या

माणिकराव कोकाटेंना जेल की बेल, फैसला कधी? न्यायमूर्तींनी एका वाक्यात सांगितलं | VIDEO

कळमनुरीत भाजपचा आमदार वाढेल; प्रज्ञा सातव यांच्या पक्ष प्रवेशानंतर मुटकुळेंचा दावा, शिंदे सेनेचं टेन्शन वाढलं

SCROLL FOR NEXT