Aurangabad Saam TV
महाराष्ट्र

आजी-आजोबांची शेवटची इच्छा म्हणून १२ वर्षीय मुलीचा विवाह 26 वर्षाच्या मुलासोबत, पण...

एका 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विवाह एका 26 वर्षाच्या मुलासोबत लावून देण्यात येत होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवनीत तापडीया -

औरंगाबाद: अल्पवयीन (Minor) मुला-मुलींची लग्न करु नये यासाठी शासनाकडून सतत जनजागृती करण्यात येते. शिवाय अशी लग्न लावून देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई देखील केली जाते. तरी देखील अनेकजण अशा प्रकारे लग्न लावून देण्याचा प्रयत्न करतात.

अशीच घटना औरंगाबाद शहरातील (Aurangabad City) लोटा कारंजा येथे उघडकीस आली आहे. एका 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विवाह एका 26 वर्षाच्या मुलासोबत लावून देण्यात येत होता. मात्र, घटनेची माहिती दामिनी पथकास मिळताच.

पाहा व्हिडीओ -

दामिनी पथकाने तत्काळ सिटी चौक पोलिसांची (City Chowk Police) मदत घेऊन शहरातील लोटा कारंजा येथे विवाह सोहळ्याच्या ठिकाणी जाऊन विवाह रोखला आहे. विशेष म्हणजे मुलीच्या वृद्ध आजी आजोबांची शेवटची इच्छा म्हणून या मुलीचा विवाह लवकर करत असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

पथकाने समजूत काढताच नातेवाईकांनी 18 वर्षाची होईपर्यंत लग्न करणार नाही अशी हमी दिली आहे. शिवाय अल्पवयीन मुला-मुलींची लग्न करु नका असं आवाहन देखील पोलिस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics : राजकारणात मोठी उलथापालथ! माजी मुख्यमंत्र्यांच्या निष्ठावान नेत्यानं साथ सोडली; भाजपने डाव टाकला

धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाहीत? नीट पेपरफुटी प्रकरणी मोदी सरकारची ठाम भूमिका

Military Sleep Method: रात्री लवकर झोप येत नाही? मग 'मिलिटरी स्लीप मेथड' वापरुन येईल २ मिनिटांत गाढ झोप

Ashadhi Ekadashi 2026 Wishes : अवघे गरजे पंढरपूर! आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा; WhatsApp, Facebook वर शेअर करा हे भक्तिमय संदेश

Maharashtra News Live Update: जंतर मंतर येथील आंदोलनाच्या समर्थनार्थ भिवंडीत तिरंगा रॅली, हजारोंचा सहभाग

SCROLL FOR NEXT