Winter Session: अधिवेशनात 26 विधेयके व अध्यादेश मांडणार, उपमुख्यमंत्र्यांची माहिती Saam Tv
महाराष्ट्र

Winter Session: अधिवेशनात 26 विधेयके व अध्यादेश मांडणार, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबईमध्ये आजपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात जवळपास २६ विधेयके चर्चेला घेण्यात येणार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुंबईमध्ये आजपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात जवळपास २६ विधेयके चर्चेला घेण्यात येणार आहेत. यामध्ये प्रलंबित विधेयके ५, प्रस्तावित (मंत्रिमंडळ मान्यता प्राप्त) २१ विधेयके अशी एकूण २६ विधेयके आणि अध्यादेश या अधिवेशनामध्ये मांडण्यात येणार आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली आहे.

सह्याद्री अतिथीगृह (Sahyadri Guest House) येथे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापाननंतर मंत्रिमंडळ (Cabinet) बैठक झाली. त्यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, ओमायक्रॉनच्या (omicron) पार्श्वभूमीवर अधिवेशन कामकाजाचा कालावधी कमी निश्चित करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

अधिवेशन दरम्यान कामकाज सल्लागार समितीची बैठक घेऊन पुढील कामकाज कालावधी विषयी निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच या अधिवेशनामध्ये विधानसभा (Assembly) अध्यक्षांची निवड देखील करण्यात येणार आहे. पुढील हिवाळी अधिवेशन नागपूरला (Nagpur) घेण्यासाठी शासन सकारात्मक आहे, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले आहे. या अधिवेशनामध्ये महत्वाचे शक्ति फौजदारी कायदा (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक २०२० मांडण्यात येणार आहे.

तसेच केंद्र सरकारने शेतकरी (Farmers) संबंधित ३ कायदे मागे घेतल्याने शेतकरी (सक्षमीकरण व संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक २०२१, शेतकरी उत्पन्न व्यापार व वाणिज्य (प्रचालन व सुलभीकरण) (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, २०२१, अत्यावश्यक वस्तू (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, २०२१, ही विधेयके मागे घेण्यात येणार आहेत.

आरक्षणाच्या (reservation) प्रश्नावर बोलताना उपमुख्यंत्री म्हणाले की, ओबीसी, एससी, एसटी आरक्षण हे संविधानाने दिले आहे. त्या हक्कांचे रक्षण केलेच पाहिजे हीच शासनाची भूमिका आहे. ओबीसी आरक्षणाविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः विरोधी पक्षाच्या नेत्यांसह सर्व ओबीसी नेत्यांची बैठक घेतली होती. या आरक्षणाविषयी शासन सकारात्मक राहणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Belly Fat: वजन होईल एका आठवड्यात कमी, सकाळच्या नाश्त्यात बनवा भाज्यांचे थालीपीठ

Salman Khan : 3,225 कोटींचा मालक अन् पायात फाटके बूट; सलमान खानची अवस्था पाहून चाहते चक्रावले, VIDEO होतोय व्हायरल

Gold Rate Today: खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोनं १८००० रुपयांनी स्वस्त; तुमच्या शहरातील आजचे दर किती?

Cucumber Benefits: काकडी सालीसकट खावी की साल काढून? जाणून घ्या योग्य पद्धत

Maharashtra News Live Update: अथर्व मनोरे अपहरण प्रकरणात मोठी अपडेट; तीन आरोपींना अटक

SCROLL FOR NEXT