MNS On Shivsena Saam Tv
महाराष्ट्र

'मंत्र्यांची दादागिरी सहन करणार नाही'; निधी वाटपावरुन शिवसेना आमदार आक्रमक

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : विकास निधी वाटपात शिवसेनेच्या आमदारांना डावलून त्यांच्या मतदार संघात विकासकांना निधी दिला जात असल्याची तक्रार शिवसेना (Shivsena) आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशा कामांना स्थगिती देत निधी वाटपाबाबत होत असलेला अन्यायाचा लेखाजोखा तयार करण्याचे काम समन्वयक म्हणून आमदार आशिष जयस्वाल (MLA Ashish Jaiswal) यांच्याकडे दिले आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील (MVA Goverment) आमदारांमध्ये निधी वाटपाच्या मुद्द्यावरून असलेली नाराजी अनेक वेळी समोर आली आहे. कधी शिवसेना आमदार तर काधी काँग्रेसच्या (Congress) आमदारांनी ही नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. आघाडीतील याच नाराजीचा फायदा घेत भाजपनेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर, शिवसेनेतील ९० टक्के आमदार हे सध्याच्या घडीला नाराज आहेत. आगामी काळात हे आमदार वेगळा पर्याय निवडू शकतात, असा सूचक इशारा देखील दिला होता.

अशातच विकास निधी वाटपाबाबतची शिवसेना आमदारांमधील ही नाराजी दूर करण्याच्या पार्श्वभूमीवर आता ज्या कामांमुळे सेना आमदारांवर अन्याय होत आहे त्या कामांना स्थगिती देत. त्या कामांचा लेखाजोखा तयार करण्याचे काम आमदार आशिष जयस्वाल यांच्याकडे दिले आहे. दरम्यान, 'आम्ही आमदार आहोत म्हणून तुम्ही मंत्री आहात, आम्ही मंत्र्यांची दादागिरी सहन करणार नाही, विकास निधीचे समान वाटप झाले पाहिजे, आम्हाला डावलने आम्ही सहन करणार नसल्याचं वक्तव्य जयस्वाल यांनी केलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Breaking : हत्यांच्या घटनांनी अमरावती शहर हादरलं

Benefits of taking Steam: वाफ घेण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहे का?

Maharashtra News Live Updates : महाविकास आघाडीचं मुंबईतील जागावाटप 90% पूर्ण, तीन जागांचा तिढा उद्यापर्यंत सोडवला जाणार

Maharashtra Assembly Election : निवडणूक जाहीर होताच महायुतीला सर्वात मोठा धक्का! राज्यात जुन्या मित्रपक्षाने सोडली साथ; VIDEO

Maharashtra Politics : विधानसभा निवडणूक जाहीर होताच महायुतीत मिठाचा खडा? अमित शहांच्या वक्तव्यानंतर शिंदे गट आक्रमक, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT