Nagpur : OYO हॉटेलमध्ये सुरु होता कुंटणखाना! पोलिसांनी केली दोघींची सुटका SaamTvNews
महाराष्ट्र

Nagpur : OYO हॉटेलमध्ये सुरु होता कुंटणखाना! पोलिसांनी केली दोघींची सुटका

नवीन नागपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनीष नगर मधील भागात ओयो (OYO) सर्व्हिस अपार्टमेंट मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून काही महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मंगेश मोहिते

नागपूर : नवीन नागपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनीष नगर मधील भागात ओयो (OYO) सर्व्हिस अपार्टमेंट मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून काही महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

हे देखील पहा :

या माहितीनुसार नागपूर क्राईमब्रांचने सापळा रचला त्यानुसार पोलिसांनी एक बनावट ग्राहक त्या ठिकाणी पाठवला. त्याने रीतसर बोलणी करून सौदा केला. याच परिसरात अनेक ठिकाणी अश्या पद्धतीचे व्यवसाय सुरु होते. पोलिसांनी पाठवलेल्या बनावट ग्राहकाद्वारे या गैरप्रकाराची खातरजमा होताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी सदर हॉटेलवर कारवाई केली.

महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेणारा आरोपी आकाश शाहूला अटक करत दोन महिलांची सुटका केली. यापैकी एक 23 वर्षीय मुलगी नागपूरची असून दुसरी मुलगी कोलकात्यावरून या व्यवसायासाठी बोलविण्यात आली होती. आरोपी शाहू याचा गुन्हेगारी रेकॉर्ड तपासून पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई

ZP ची बनावट कागदपत्रं बनवून उभारली इमारत; शिंदे गटाच्या दोन नेत्यांना अटक

Sharad Pawar : महायुतीत चौथा भिडू येणार? पवारांच्या एन्ट्रीनं शिंदेंचं टेन्शन वाढणार?

जयंत पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, डिलिमिटेशनसाठी पवार एनडीएसोबत? दिग्गज नेत्याचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: आमदार-नगरसेवक वाचवण्यासाठी धावाधाव; ठाकरे सेनेकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न

SCROLL FOR NEXT