भाजपकडे लढण्यासाठी स्वतःच हत्यार नाही, नेहमी "भाडोत्रींचा" वापर होतो- संजय राऊत Saam Tv
महाराष्ट्र

भाजपकडे लढण्यासाठी स्वतःच हत्यार नाही, नेहमी "भाडोत्रींचा" वापर होतो- संजय राऊत

केंद्रीय मंत्री महागाई, बेरोजगारी विषयी बोलत नाहीत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी, Narendra modi केंद्रीय मंत्री महागाई, बेरोजगारी विषयी बोलत नाहीत. देशाच्या सीमा असुरक्षित झाले आहेत. त्याबद्दल बोलत नाहीत. हे भलत- सलते प्रश्न निर्माण करुन, लोकांचे मन विचलित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत" अशी टीका शिवसेना Shivsena नेते आणि खासदार संजय राऊत Sanjay raut यांनी यावेळी केली आहे. त्यांनी आज औरंगाबादमध्ये महागाई विरोधामध्ये आक्रोश मोर्चा Protest आयोजित केला आहे.

त्याच पार्श्वभूमीवर ते बोलत होते. औरंगाबादचा मोर्चा हा महाराष्ट्रमधील त्या विषयी पडलेली पहिली ठिणगी आहे, असे राऊत यांनी सांगितले आहे. भाजपा लढण्याकरिता कधी स्वत:च हत्यार वापरत नाही. त्यांच्याकडे हत्यार नाही. ते दुसऱ्याच्या पिचलेल्या खांद्याचा वापर करत असतात. यामुळे त्यांचा प्रत्येक बार फुसका ठरत आहे. बॉम्ब फोडणार म्हणतात,पण साधी लवंगी, फटाका देखील यांच्याकडून फुटत नाही" अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपाचा समाचार घेतला आहे.

हे देखील पहा-

ईडी, सीबीआयच्या घोषणा करत तिथून देखील काही मिळत नाही. भाडोत्री राजकीय पक्ष हाताशी धरुन, आम्हाला विरोध केला जात आहे. शिवसेना एक हत्ती आहे. कोण पाठिमागून भुंकत असेल, तर त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही" असे संजय राऊत म्हणाले आहेत. नवाब मलिकांच्या मुद्यावर म्हणाले की, 'मुख्यमंत्री खंबीरपणे नवाब मलिकांच्या पाठिशी उभे राहणार आहेत' "नवाब मलिक न्यायाची लढाई लढत आहेत. ते मविआच्या वतीने लढत आहेत. हे प्रकरण वेळीच संपाव अशी इच्छा होती. पण भाजपाला शहाणपणा येत नसेल, तर लढाई सुरुच राहणार आहे, अजून काही समोर आलेलं नाही" असे राऊत म्हणाले आहेत.

"इंटरवल के बाद संजय राऊत की एन्ट्री होगी. अजून मलिकांचा इंटरवल झाला नाही. लंबा चलनेवाला पिक्चर है" असे राऊत यावेळी म्हणाले आहेत. "पाठिमागून वार करत असतात, मर्दांसारखे समोर या. दुसऱ्यांचे खांदे आणि गंजलेल्या बंदुकांनी हल्ला करु नका. आम्ही घाबरत नाही असे राऊत यावेळी म्हणाले आहेत. "आमचे नवाब मलिक सगळयांना भारी पडले आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा त्यांना पाठिंबा आहे. नवाब मलिक चुकत आहेत, असे कोणाला वाटत नाही" असे राऊत यांनी सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Exit Poll Maharashtra : दापोली विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: रत्नागिरी मतदारसंघातून उदय सामंत होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: गोदिंयामधून भाजपचे विनोद अग्रवाल होणार आमदार? पाहा Exit Poll

Mankhurd Exit Poll: अबू आझमी की नवाब मलिक, मानखुर्द विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण?

Saam Exit Poll : सांगलीत भाजप मारणार बाजी? एक्झिट पोलमध्ये कौल कुणाला?

SCROLL FOR NEXT