देशासाठी तीन युद्धात सहभाग असणाऱ्या माजी सैनिकाचा 81वा वाढदिवस रोहिदास गाडगे
महाराष्ट्र

देशासाठी तीन युद्धात सहभाग असणाऱ्या माजी सैनिकाचा 81वा वाढदिवस

देशासाठी तीन युद्धात सक्रिय सहभाग घेत लढलेल्या व युद्धाचे साक्षीदार राहिलेल्या खेड तालुक्यातील सोळु गावातील माजी सैनिक गुंडा हरी गावडे यांचा 81 वा वाढदिवस ग्रामस्थांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

रोहिदास गाडगे

खेड : देशाच्या सीमेवरील तीन युद्धात सक्रिय सहभाग घेत देशासाठी लढलेल्या व युद्धाचे साक्षीदार राहिलेल्या खेड तालुक्यातील सोळु गावातील माजी सैनिक गुंडा हरी गावडे यांचा 81 वा वाढदिवस ग्रामस्थांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी माजी सैनिक गावडे यांचा विशेष सन्मान करत त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थाना केली.

हे देखील पहा -

गुंडा हरी गावडे हे माजी सैनिक आहेत. त्यांनी 1962, 1965 व 1971 च्या तीनही युद्धात भारतीय सैनिक म्हणुन आपलं कर्तव्य पार पाडले. त्यांचे कर्तृत्व आज देशातील प्रत्येकाला शौर्याची ताकद देणारे आहे. त्यांचा आज 81 वा वाढदिवस सोळु गावात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी गुंडा गावडे यांचा सन्मान करत वाढदिवसानिमित्ताने केक कापला. 81 वर्षानंतर हा वाढदिवसाचा क्षण त्यांच्यासाठी अविस्मरणीय असल्याची भावना माजी सैनिक गुंडा गावडे यांनी व्यक्त केली.

वाढदिवस तर प्रत्येकाचा, प्रत्येक वर्षी येतच असतो. आपण वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देखील देत असतो, पण आजच्या दिवशी देशाच्या सीमेवर सलग तीन युद्धात लढण्याची भुमिका निभावणाऱ्या माजी सैनिकाचा वाढदिवस साजरा होत असताना अभिमान वाटेल असे त्यांचे तेज, या वयात त्यांच्यात दिसणारा भक्कमपणा प्रेरणा देणाराच आहे. माजी सैनिक गुंडा गावडे यांचा 81 वा वाढदिवस साजरा होत असताना प्रत्येक जण त्यांच्या पायावर नतमस्तक होत होता. माजी सैनिक गावडे यांच्या दीर्घायुष्यासाठी व निरोगी जीवनासाठी त्यांना ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : शिंदे गटाला झटका, महिला नेत्याचा अजित पवार गटात जाण्याचा निर्णय

पश्चिम महाराष्ट्रात शिंदेंना भाजपचा धक्का, आमदाराच्या भावासह ४० पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र!

Body changes after death: मृत्यूनंतर व्यक्तीचं तोंड अनेकदा का उघडं राहतं?

Arjun Tendulkar : सचिनच्या पावलावर चालत अर्जुनने केला साखरपुडा; वयाचं गुपित ऐकून चाहत्यांमध्ये रंगली चर्चा

Maharashtra Live News Update: रायगडच्या पायथ्याशी जोरदार पाऊस

SCROLL FOR NEXT