Raigad News Saam Tv
महाराष्ट्र

Raigad News : पेणमध्ये सापडलेली 'ती' स्फोटके म्हणजे डमीबॉम्ब; पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांचा निर्वाळा

सुमारे चार तासांच्या प्रयत्नानंतर संशयास्पद बॉम्ब निकामी करण्यात यश

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन कदम

Raigad News - रायगड (Raigad) जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे आणि उरण तालुक्यात संशयित बोट सापल्याने गेल्या महिन्यात खळबळ उडाली होती. त्यातच आता गुरुवारी संध्याकाळी पेण तालुक्यातील भागावती नदीच्या पुलाजवळ एक बॉम्ब सदृष्य वस्तु आढळून आली होती. या घटनेची पेण पोलिसांना (Police) मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान, नवी मुंबई (Navi Mumbai) आणि रायगडच्या बॉम्ब शोधक पथकाच्या मदतीनं हा बॉम्ब निकामी करण्यात यश मिळालं आहे.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनास्थळी पोलीस यंत्रणा आणि बघ्यांची एकच गर्दी झाली होती. लाल, नारंगी रंगाच्या स्फोटकांच्या कांड्या आणि त्यांना जोडणाऱ्या वायर अशा स्वरूपातील ही स्फोटक असल्याने रायगड पोलिसांनी बाँब शोधक आणि विनाषक पथकाला पाचारण केले होते. त्याशिवाय रायगड पोलीस अधीक्षक, खालापूर, रोहा पोलीस घटनास्थळी दाखल झालं होतं. अखेर संशयास्पद आढळून आलेली वस्तू ही डमी बॉम्ब असल्याचे निष्पन्न झालं आहे.

मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुक बंद ठेऊन रात्री उशिरा या पथकांनी ही बाँब सदृष्य वस्तु स्कॅनिंग करून निकामी केले. यानंतर सदर स्फोटक हा डमी बॉम्ब असल्याचा निर्वाळा रायगडचे पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिला.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Suryakumar Yadav: सूर्यकुमारला डबल धक्का; BCCI नंतर मुंबई इंडिन्यसही साथ सोडणार?

Maharashtra News Live Update: सातारा महामार्गावर एसटी बसचा अपघात

सुनेत्रा पवारांनी छगन भुजबळांना खासदारकी का दिली नाही? समोर आले 'हे' मोठे कारण, वाचा इनसाईड स्टोरी

Gautami Patil-Bhau Kadam : 'हिल हिल पोरी हिला...'; गौतमी पाटील अन् भाऊ कदम यांच्या केमिस्ट्रीची जादू, पाहा Unseen Photo

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 92% ते 283% पर्यंत वाढ होणार? सरकार किती वाढवणार फिटमेंट फॅक्टर? वाचा...

SCROLL FOR NEXT