EX MLA Ramesh Kadam Walks Out of Jail Saamtv
महाराष्ट्र

Ramesh Kadam Bail: तब्बल ३१२ कोटींचा कथित घोटाळा... ८ वर्षांनी तुरूंगातून सुटका; माजी आमदार रमेश कदम यांचे जंगी स्वागत

EX MLA Ramesh Kadam Walks Out of Jail: अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील कथित घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार रमेश कदम हे तुरुंगात होते.

विकास काटे, ठाणे

Thane News: अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील कथित घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार रमेश कदम हे तुरुंगात होते. तब्बल आठ वर्षांनंतर त्यांना न्यायालयाने दिलासा दिला असून ठाण्यातील कारागृहातून त्यांची जामिनावर सुटका झाली. सुटकेनंतर कारागृहाबाहेर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. (Thane Latest News)

याबाबत अधिक माहिती अशी की, अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील कथित 312 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार रमेश कदम (Ramesh Kadam) हे तुरुंगात होते. गेल्या 8 वर्षांपासून ते ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होते. एका महिन्यांपूर्वीच त्यांची जामीन मंजूर झाला होता. त्यानंतर आज (20, ऑगस्ट) त्यांची कारागृहातून सुटका झाली..

रमेश कदम यांची सुटका होणार असल्याची बातमी त्यांच्या समर्थकांना आधीच मिळाली होती. सुटकेनंतर त्यांचे कार्यकर्त्यांकडून ढोल- ताशाच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. मुंबई, ठाणे, सोलापूरमधून अनेक कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी आले होते, ज्यामुळे परिसरात मोठा बंदोबस्त ठेवला होता.

रमेश कदम हे राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) पक्षाचे माजी आमदार होते. त्यांनी 2014 आणि 2019 साली तुरुंगात असताना अपक्ष उमेदवार म्हणून सोलापूर मोहोळ या मतदार संघातून लढवली होती. रमेश कदम  अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: धक्कादायक! ओळखीनं केला घात; बॉक्समध्ये आढळला बेपत्ता होमगार्ड महिलेचा मृतदेह

Bull Beauty Parlour: नंदुरबारमध्ये बैलांचं ब्युटी पार्लर

Raj Thackeray Meeting Devendra Fadnavis: बेस्ट पराभवानंतर अवघ्या २४ तासात राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीला चर्चांना उधाण

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांचं संघ दक्ष, RSS च्या बैठकीला सुनेत्रा पवारांची हजेरी? कंगनाच्या घरी काय घडलं?

IT Job Crisis: आयटी क्षेत्रात नोकर कपात; 80 हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ

SCROLL FOR NEXT