Thane News
Thane News Saam tv
महाराष्ट्र

Thane News: पाठलाग करत कॅबिनपर्यंत पोहचत तरुणीची काढली छेड; तरूणाला चोप देत दिले पोलिसांच्या ताब्यात

विकास काटे, ठाणे

ठाणे : कामाच्‍या ठिकाणी रिक्षातून जात असताना अज्ञात तरूणाकडून तरूणीचा पाठलाग सुरू होता. पाठलाग (Thane News) करत तो तरूणीच्‍या कार्यालयापर्यंत पोहचून तिची छेड काढली. आरडाओरड केल्‍यानंतर बाजूच्‍या नागरीकांना सदर तरूणाला चोप देत (Police) पोलिसांच्‍या स्‍वाधिन केले. (Latest Marathi News)

दुपारी एकच्या सुमारास एक तरुणी नेहमीप्रमाणे पाचपखाडी इथल्या चंदनवाडी येथे रिक्षातून उतरून कामाच्या ठिकाणी जात होती. या दरम्‍यान एक अज्ञात इसम तिचा पाठलाग करत असल्याचे तिच्या लक्षात आले. घाबरलेल्या तरुणीने रस्ता बदलला तरी देखील तो इसम तिचा पाठलाग करत होता. घाबरलेल्या अवस्थेतच ती तरुणी कशीबशी आपल्या कार्यलयात पोहचली. कार्यालयाच्या केबिनमध्ये घुसली असता हा अज्ञात इसम तिला कॅबिनचा दरवाजा उघडण्यास दबाव टाकू लागला.

संपूर्ण प्रकरण घडत असताना तरुणीने आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर आजूबाजूच्या दुकानातील दुकानदारांनी तरूणाला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्‍याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने त्‍या तरूणाला पकडून कार्यालयाबाहेर खेचत आणले. तरुणीची छेड काढल्या प्रकरणी लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी फळीने बेदम चोप दिला. या घटनेची माहिती नौपाडा पोलिसांना मिळताच नौपाडा पोलिसांनी घटनास्थळी येत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी त्या इसमाला जमावाच्या तावडीतून सोडवत ताब्यात घेतलं आहे. नौपाडा पोलीस या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहेत तरुणीच्या जबाबानंतर पुढील प्रक्रिया सुरू होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

IPL 2024 LSG vs KKR: सुनिल नारायणच्या फटकेबाजीने LSG च्या गोलंदाजांना दाखवलं 'आस्मान'; लखनऊसमोर २३६ धावांचे आव्हान

Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृतीमुळे घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT