Thane Shahapur Crime News  Saam TV
महाराष्ट्र

Thane News: तोतया पोलीस पथकाचा कुरियर व्हॅनवर दरोडा; ५ कोटी ४० लाख लुटले, शहापूर तालुक्यातील घटना

Thane Crime News: पोलिसांचे पथक असल्याचे भासवून अज्ञात दरोडेखोरांच्या टोळीने एका कुरिअर कंपनीच्या व्हॅनवर दरोडा टाकून त्यामधील ५ कोटी ४० लाख रुपयांची रोकड लुटल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

Satish Daud

फैयाज शेख, साम टीव्ही शहापूर

Thane Shahapur Crime News

पोलिसांचे पथक असल्याचे भासवून अज्ञात दरोडेखोरांच्या टोळीने एका कुरिअर कंपनीच्या व्हॅनवर दरोडा टाकून त्यामधील ५ कोटी ४० लाख रुपयांची रोकड लुटल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील शहापूर तालुक्यातील आठगाव हद्दीत गुरुवारी (ता. २१) ही घटना घडली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याप्रकरणी कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत ११ संशयितांना ताब्यात घेतलंय. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार संतोष तानाजीराव थोरात हे मूळ जळगावचे रहिवासी असून ते स्कायकिंग कुरियर सर्व्हिस कंपनीत नोकरी करतात.

या कुरिअर कंपनीमार्फत जळगाव येथून मुंबईतील व्यापारांना व्हॅनमधून रोकड पोहचवली जाते. तक्रारदाराने या कामाची जबाबदारी कैलाश लोहार आणि सचिन सोडे या दोन कर्मचाऱ्यांकडे दिली होती. १५ मार्च रोजी पहाटे कैलाश आणि सचिन जळगाव येथून रोकड घेऊन कुरियर व्हॅनने मुंबईच्या दिशेने निघाले होते.  (Breaking Marathi News)

दरम्यान, मुंबई-नाशिक महार्गावरील शहापूर तालुक्यातील आटगाव परिसरात व्हॅन आली असता अज्ञात दरोडेखोर इनोव्हा कारमधून आले. आपण पोलीस असल्याचं सांगत दरोडेखोरांनी कुरिअरची व्हॅन थांबवली. व्हॅनमध्ये काय रोकडे आहे का? असल्यास तुम्हाला जेलमध्ये जावे लागेल, असा दम आरोपींनी व्हॅनचालकाला दिला.

व्हॅनची तपासणी करत आरोपींनी ५ कोटी ४० लाखांची रोकड घेऊन नाशिकच्या दिशेने पळ काढला. दरम्यान, व्हॅन चालक आणि तक्रारदाराने मुंबईतील कुरियर कंपनीच्या कार्यालयात जाऊन घडलेला प्रकार तेथील व्यवस्थापकाला सांगितला. सदरील घटना ठाणे जिल्ह्यातील शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली.

दरम्यान, तक्रारदार संतोष तानाजीराव थोरात यांच्या तक्रारीवरून शहापूर पोलिसांनी ८ अज्ञात दरोडेखोरांवर भादंवि कलम १७०, ३४, ३४१, ३१९, ४२० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ११ संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्या पोलीस त्यांची कसून चौकशी करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MSRTC Fare: एसटी बसचा प्रवास आणखी महागणार? परिवहन मंत्र्यांनी दिले तिकीट दरवाढीचे संकेत

IPS Officer Transfer: सातपुते, कृष्ण प्रकाश अन् मुंडेंसह २४ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात खळबळ

Buldhana Crime: बुलडाणा हादरले! नवऱ्याकडून बायकोची हत्या, कुऱ्हाडीने वार करत जागीच संपवलं

Maharashtra News Live Update: - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यापोस्टरची जाळपोळ... नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक..

Late Night Sleeping Problem: रात्री २-३ वाजेपर्यंत जागे राहिल्याने शरीरात होतात 'हे' चिंताजनक बदल

SCROLL FOR NEXT