Sambhajinagar, imtiaz jaleel saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Adarsh Scam : मी तोंड उघडलं तर तुमची पळता भुई थोडी होईल, 'आदर्श' प्रकरणाच्या तपास यंत्रणेस इम्तियाज जलील यांचा इशारा (पाहा व्हिडिओ)

adarsh nagari sahakari patsanstha aurangabad : शेवटची संधी म्हणून तपास अधिकारी अथवा पथकास देताे असे खासदार जलील यांनी नमूद केले.

Siddharth Latkar

- नवनीत तापडिया

Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या 200 कोटींच्या घाेटाळ्याचा निषेध नाेंदविण्यासाठी तसेच पैसे परत मिळावेत यासाठी आज (साेमवार) ठेवीदारांनी उपनिबंधक कार्यालया समाेर थाळीनाद आंदाेलन छेडले. या आंदाेलनात हजाराे ठेवीदार सहभागी झाले हाेते. (Maharashtra News)

या आंदाेलनात खासदार इम्तियाज जलील देखील सहभागी झाले आहेत. यावेळी खासदार जलील यांनी भाषणातून सर्व संबंधित शासकीय विभाग याकडे दुर्लक्ष करत असतानाही आदर्श नागरी पतसंस्थेकडून कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी कशी झाली अशी विचारणा केली. विविध दाखले ते त्यांनी गैरव्यवहार झाल्याचे नमूद केले.

खासदार जलील म्हणाले सहकार विभाग, लेखा परीक्षक, चार्टर्ड अकाउंटंट, संचालक आणि चेअरमन हे सर्वच या कोट्यवधीच्या घोटाळ्याचा भाग आहेत. आता तर पोलीसही या लाेकांना मदत करत आहेत असा आराेप देखील जलील यांनी केला.

ज्यावेळी मी आवाज उठविला त्यावेळी पाेलिस यंत्रणा जागी झाली असे म्हणत खासदार जलील म्हणाले आमचा विश्वास पाेलिस यंत्रणेवर संपला आहे. शेवटची संधी म्हणून तपास अधिकारी अथवा पथकास देताे. याेग्य तपास करा अन्यथा मला सर्व काही उघड करावे लागेल असा सज्जड दम खासदार जलील यांनी यंत्रणेस दिला.

दरम्यान ठेवीदारांचे पैसे मिळवून देणारच असे आश्वासन इम्तियाज जलील यांनी आंदाेलक ठेवीदारांना दिला. याबराेबरच आपल्या मागण्यांची दखल न घेतल्यास सहकार मंत्र्यांना देखील जाब विचारला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

Ladki Bahin Yojana : 'पोर्टल बंद, नव्या नोंदणी होणार नाहीत'; उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचं भविष्यच सांगितलं

Sleep Internship: पुण्याच्या तरुणीने दररोज ९ तास झोप काढून कमावले ९ लाख रुपये; नेमकी नोकरी आहे तरी कोणती?

SCROLL FOR NEXT