Shahajibapu Patil
Shahajibapu Patil Saam TV
महाराष्ट्र

बाळासाहेबांची शिवसेना नाव मिळाल्यावर शहाजीबापू पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, आयुष्यभर बाळासाहेबांनी...

भारत नागणे

Eknath Shinde Group: केंद्रीय निवडणूक आयोगाने आज शिवसेनेसाठी आणि राज्यातील राजकारणासाठी महत्वपुर्ण असणारा विषय निकाली काढला आहे. आयोगाने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' तर उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नावं दिलं आहे. शिवाय उद्धव ठाकरेंच्या गटासाठी मशाल हे चिन्ह देखील आयोगाने दिलं आहे.

निवडणून आयोगाच्या या निर्णयावर आता दोन्ही गटाकडून वेवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अशातचं आता शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahjibapu Patil) यांनी हा बाळासाहेबांच्या विचाराला मानून काम करणाऱ्या करणाऱ्या शिंदे गटासाठी बाळासाहेबांची शिवसेना हे नावं मिळणं हा योग्य निर्णय असल्याचं म्हटलं आहे.

पाहा व्हिडीओ -

आयोगाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना पाटील म्हणाले, बाळासाहेबांची शिवसेना हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळालेलं नाव म्हणजे आयोगाचा योग्य निर्णय असून, हा निर्णय म्हणजे ४० आमदार आणि १२ खासदाराच्या भावनेचा निवडणूक आयोगाकडून विचार आणि कदर करण्यात आला आहे.

ते पुढे म्हणाले, एकूण राजकीय परिस्थिती पाहता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचाराची सर्व लोकं एकनाथ शिंदे यांच्या विचारांसोबत जायला तयार आहेत. कारण संपुर्ण आयुष्यभर ज्या बाळासाहेबांनी काँग्रेसला विरोध केला त्याच काँग्रेससोबत उद्धव ठाकरेंनी मैत्री केली.

दोघांच्या वागण्यामध्ये मोठी तफावत निर्माण झाल्यामुळे राज्यातली खरी शिवसेना शिंदेच्या नेतृत्वात उभी ठाकली आहे. त्यामुळे आज मिळालेल्या नावाबाबत आम्ही समाधानी असून प्रामाणिक आणि नैतिकतेने काम करणाऱ्या शिवसैनिकाचा हा विजय असल्याचंही पाटील म्हणाले.

Edited By - Jagdsih Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : बारामतीत मडकं फोडणारा "तो" कार्यकर्ता कोण?

Special Report : तुम्हारे पास क्या है? कोल्हेंच्या डायलॉगबाजीने अहमदनगरात वातावरण तापलं

Mithila Palkar : ‘वेब क्वीन’ मिथिलाचा अनोखा साज, लूकने वेधले लक्ष

Nashik Lok Sabha: शांतीगिरी महाराज निवडणूक लढण्यावर ठाम, नाशिकमध्ये महायुतीला घाम! गोडसेंच्या अडचणी वाढणार?

Special Report : कुलरची थंड थंड हवा ठरतेय जिवघेणी! 7 वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत

SCROLL FOR NEXT