uddhav thackeray and sharad pawar Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : ठाकरेंची खेळी, शरद पवारांना धक्का बसणार? कोल्हापूरमधील दिग्गज नेत्याला थेट ऑफर

Samarjit Ghatge Offered Entry into Shiv Sena : कोल्हापूरच्या कागल तालुक्यात राजकीय हालचालींना वेग; समरजीत सिंह घाटगे यांना शिवसेना (ठाकरे गट) कडून थेट ऑफर. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका बसण्याची शक्यता.

Namdeo Kumbhar

Samarjit Ghatge News : कागलच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते समरजीत सिंह घाटगे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात घेण्यासाठी स्थानिक नेत्यांकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहे. ठाकरेंच्या नेत्याने समरजीत सिंह घाटगे यांना शिवसेनेत येण्याची थेट ऑफर दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर समरजीत सिंह घाटगे यांनी भाजपला रामराम करत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पण त्यांना विधानसभेला पराभावाचा धक्का बसलाय. आता त्यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून ऑफर देण्यात आली आहे.

शिवसेना उपनेते संजय पवार यांनी साम टीव्हीला बोलताना समरजीत सिंह घाटगे यांना पक्षात घेण्यासाठी प्रयत्न करू असे वक्तव्य केलेय. कागलच्या राजकारणात समरजीत सिंह घाटगे यांचा मोलाचा वाटा आहे. हसन मुश्रीफ आणि संजय बाबा घाटगे यांच्या राजकारणाचा फटका कागल तालुक्याला बसला आहे. समरजीत सिंह घाटगे यांना पुन्हा उभारी देण्यासाठी मी स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलणार आहे, असे संजय पवार म्हणाले.

कोल्हापूरमधील कागलच्या राजकारणात समरजीत सिंह घाटगे यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मविआचे उमेदवार असलेल्या समरजीत यांचा पराभव झाला. महायुतीचे राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी त्यांचा पराभव केला होता. दरम्यान, विधानसभेला संजय बाबा घाटगे यांनी शिवसेनेत असूनही मुश्रीफ यांना मदत केल्याने समरजीत यांच्या पराभवाला हातभार लागला, अशी टीका होत आहे.

समरजीत सिंह घाटगे यांना ठाकरे गटाकडून थेट ऑफर दिली गेली, त्यानंतर कागलच्या राजकारणात चर्चेला उधाण आले. या घडामोडींमुळे कागलच्या राजकारणात नवे वादळ येण्याची शक्यता आहे. समरजीत यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्यास स्थानिक राजकारणाची समीकरणे बदलू शकतात. पण मविआमध्ये वितुष्ट येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT