Jalgaon News Saam Tv
महाराष्ट्र

Jalgaon: हा तर बाळासाहेबांचा अवमान! बॅनरमागे सुरु हाेता सट्टा; ठाकरे- शिंदे गटाचा संघर्ष उफाळला

बाळासाहेब ठाकरेंच्या बॅनर मागे खेळला जात हाेता सट्टा; ठाकरे- शिंदे गटाचा संघर्ष उफाळला

संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव

जळगाव - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे समोर बॅनर लावलेले शिवसेना (Shivena) संपर्क कार्यालयामागेच्या मागील बाजूस सट्ट्याचा अड्डा सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या सट्ट्याच्या अड्डयावर पोलिसांनी कारवाई केली आहे. उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांचा दौरा आहे, त्याच्या पूर्वीसंध्येला शिवसेनेच्या बॅनरच्या आड सुरु असलेल्या सट्ट्याच्या अड्डयावर पोलिसांनी केलेल्या या कारवाईने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

याठिकाणी सट्टा सुरु असल्याची माहिती शिवसेनेच्या माजी महिला पदाधिकारी व सद्यस्थितीत शिंदे गटात सहभागी झालेल्या एका महिला पदाधिकाऱ्याने पोलिसांना दिली. माहिती समोर येताच सट्ट्याचा अड्ड उध्दव ठाकरे समर्थक एका शिवसेना पदाधिकाऱ्याचा असल्याचा आरोप या महिला पदाधिकाऱ्याने केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान यावरुन आता जळगावात उध्दव ठाकरे समर्थक व शिंदे गट यांच्यातील संघर्ष उफाळून आल्याचे पहायला मिळत आहे.

हे देखील पाहा -

शिंदे गटात सहभागी झालेल्या पदाधिकारी शोभा चौधरी यांना ते राहत असलेल्या परिसरात एका ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंचे बॅनर लावलेल्याठिकाणी लोकांची गर्दी असल्याचे दिसून आले. शोभा चौधरी यांनी खात्री केली असता, याठिकाणी सट्ट्याचा खेळ सुरु असल्याचे दिसून आले. शोभा चौधरी यांनी याबाबत एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली.

त्यावरुन पोलीस घटनास्थळी पोहचे पर्यंत याठिकाणी सट्टा खेळणारे व खेळविणारे दोन्ही पसार झाले होते. किमान चाळीस ते ५० असल्याची माहिती शिवसेना महिला पदाधिकारी शोभा चौधरी यांनी दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे बॅनर लावून त्यामागे जर सट्टा खेळविला जात असेल तर हा बाळासाहेबांना मोठा अपमान असल्याचंही शोभा चौधरी यांनी म्हटलं आहे

रामेश्वर कॉलनीतील या सट्टयाच्या अडडयावर पोलिसांनी कारवाई केली असून अनिल लक्ष्मण माळी याच्यासह सट्टा पेढीमालक जावेद शेख सलीम या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे शोभा चौधरी या शिवसेनेत असतांनाही हा सट्टयाचा अड्डा सुरु होता. मात्र त्यावेळी त्यांना तो दिसला नाही का, आता ते शिंदे गटात गेल्यामुळे त्यांनी याबाबत तक्रार केल्याचेही बोलले जात आहेत. एकंदरीत या घटनेमुळे पुन्हा उध्दव ठाकरे समर्थक शिवसैनिक व शिंदे गट आमनेसामने आल्याचे पहायला मिळत असून भविष्यात हा वाद टोकाला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi : देशाचे ३ मोठे शत्रू कोणते? रावण दहनानंतर पंतप्रधान मोदींचे देशावासियांना मोठे आवाहन

Shivsena Dasara Melava live: पुढच्या दसऱ्याला धनुष्यबाण आपलाच; संजय राऊतांचा दावा

Dussehra Horoscope : दसऱ्यानंतर ३ राशींचे नशीब चमकणार! धनलाभासह रखडलेली कामे पूर्ण होण्याचे संकेत

Shivsena Dasara Melava : अमित शाह हेच खरे लॉरेन्स बिश्नोई; संजय राऊतांचा थेट केंद्रीय गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप

Maharashtra News Live Update: जरांगे आमच्या दोन पक्षांमध्ये मतभेद तयार करत आहेत: गिरीश महाजन

SCROLL FOR NEXT