Leaders of Thackeray Sena and Congress amid intensifying discussions over the lone Rajya Sabha seat in Maharashtra. Saam Tv
महाराष्ट्र

Rajya Sabha Election: राज्यसभेसाठी ठाकरेंची मोठी खेळी, पवारांना वगळून थेट काँग्रेसच्या हायकमांडशी चर्चा

Maharashtra Politics: ठाकरेसेना आणि काँग्रेसमध्ये राज्यसभेसाठी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय... मात्र शरद पवारांना वगळून काँग्रेस हायकमांडसोबत ठाकरेसेनेनं काय रणनिती आखलीय....राज्यसभेच्या महायुद्धात कोणाचा उमेदवार राज्यसभेत जाणार?

Suprim Maskar

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका बाजूला महायुतीचा वरचश्मा दिसत असतानाच, दुसरीकडे महाविकास आघाडीत मात्र 'बिघाडी' होण्याचे संकेत मिळत आहेत. याला निमित्त आहे आगामी राज्यसभा निवडणूकीचं....राज्यसभेच्या ७ जागांसाठी १६ मार्च २०२६ रोजी रणसंग्राम होणार आहे...मात्र मविआच्या वाट्याला येणारी राज्यसभेची एकमेव जागा कोणाला द्यायची यावरून मविआत ठिणगी पडलीय...त्यात काँग्रेस आणि ठाकरेसेनेनं शरद पवारांना वगळून राज्यसभेसाठी कशी फिल्डिंग लावलीय..पाहूयात...

शरद पवारांना बाजूला सारत राज्यसभा आणि विधान परिषदेसाठी दोन्ही पक्षांत गुप्त चर्चा?

ठाकरेसेनेकडून थेट काँग्रेस हायकमांडशी संपर्क साधून जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्याचा प्रयत्न

पवारांना राज्यसभेवर पाठवण्यास काँग्रेसमधील एका गटाचा विरोध

विधानपरिषद आणि राज्यसभेवरून ठाकरेसेना आणि काँग्रेसमध्ये 'गिव्ह अँड टेक'ची रणनीती

'एक जागा तुम्ही घ्या, एक आम्हाला द्या' असा करार दोन्ही पक्षात होण्याची शक्यता

दरम्यान शरद पवारांची राज्यसभेवर जाण्याची इच्छा असल्याचं सांगतानाच महाविकास आघाडीत मोठा पक्ष असल्यानं शिवसेनेचा पहिला हक्क असल्याचं सूचक विधान राऊतांनी केलंयं...तर राज्यसभेच्या जागेवर काँग्रेसनेही दावा ठोकलाय... राज्यसभेच्या 7 जागांसाठी 41 मतांचा कोटा असला तरी कोणत्या पक्षाचे किती खासदार निवडून येण्याची शक्यता आहे...

सध्या भाजपचं 131, शिंदेसेनेचे 57, दादांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीचं संख्याबळ 40 इतकं आहे... तर मित्रपक्षांची मदत घेतल्यानंतर महायुतीचे 6 खासदार निवडून येण्याची शक्यता

तर महाविकास आघाडीत ठाकरेसेनेचे 20, काँग्रेसचे 16 तर पवारांच्या राष्ट्रवादीचे 10 आमदार आहेत.. त्यामुळे महाविकास आघाडीचा 1 खासदार निवडून येण्याची शक्यता

दरम्यान ठाकरेसेनेनंची काँग्रेस हायकमांडसोबत चर्चा सुरु असतानाच अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते गैरहजर राहिले...तसचं राज्यसभेवरून उत्तर देण्यास काँग्रेस आणि ठाकरेसेनेच्या नेत्यांनी टाळाटाळ केली....खरतर अजितदादांच्या निधनानंतर शरद पवारांच्या पक्षाकडून सुरु असणारी विलिनीकरणाची चर्चा यामुळे काँग्रेस अस्वस्थ आहे...त्यामुळे राज्यसभेची ही एक जागा महाविकास आघाडीला एकत्र ठेवणार की मविआतील मित्रपक्षांमधील दरी अधिक रुंदावणार? हे आगामी काळात कळेलच.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bribe Case: मंत्रालय लाच प्रकरण; नरहरी झिरवळ राजीनामा देणार? मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

'अजितदादांच्या शोक प्रस्तावावर बोलणं दुर्देवी'; अमोल मिटकरी असे का म्हणाले?

थेट मुंडेंच्या मुलाला मारहाण, बीडमध्ये पुन्हा वाल्मिक कराड समर्थकांची दहशत वाढली

मविआनं सरकारला पाठवलं 15 प्रश्नांचं पत्र; उत्तर देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी काढल्या शुद्धलेखनाच्या चुका

चड्डी बनियान गँग, त्यांनी त्यांची अब्रू वेशीला टांगलीय; एकनाथ शिंदे का भडकले? पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT