Uddhav Thackeray vs CM Shinde 
महाराष्ट्र

Uddhav Thackeray vs CM Shinde: ठाकरेंनी केली शिंदेंची मिमिक्री; मुख्यमंत्री शिंदेंचाही उद्धव ठाकरेंवर पलटवार

Bharat Jadhav

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नक्कल करत थेट शिंदेंच्या बोलण्यावर टीका केली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही ठाकरेंना मिमिक्री करण्याशिवाय काही काम राहिलं नसल्याची टीका केलीय.

विधानसभा निवडणूकीपुर्वी उद्धव ठाकरेंनी मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात केलीय. त्यातच ठाकरेंची भूमिका मुस्लिमधार्जिणी असल्याची टीका शिंदे गट आणि भाजपकडून करण्यात येतीय. त्यामुळे आपण हिंदूत्व सोडलं नसल्याचं बिंबवण्यासाठी ठाकरेंनी राज्यभर भगवा सप्ताह आयोजित केला होता. त्याचा समारोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नक्कल करत जोरदार टोलेबाजी केली.

तर बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी उद्धव ठाकरेंना जंगलात फोटो काढण्यासाठी पाठवलं असतं, असं म्हणत पलटवार केलाय. लोकसभा निवडणूकीत उद्धव ठाकरेंनी पक्षफोडीचा मुद्दा उपस्थित करत शिंदेंना लक्ष केलं. मात्र त्याचा थेट फायदा झाला नाही. त्यामुळे आता विधानसभेसाठी ठाकरेंनी उचललेला हिंदूत्वाचा मुद्दा आणि एकनाथ शिंदेंवरील टीका मतदारांना रुचणार की लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही फटका बसणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT