Sanjay Raut shares emotional post from hospital — continues writing despite health concerns. saam tv
महाराष्ट्र

Sanjay Raut : संजय राऊतांची भावनिक पोस्ट; हॉस्पिटलमध्येही थांबली नाही लेखणी

Sanjay Raut : संजय राऊत, लढवय्या माणूस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची धडाडती तोफ. प्रकृती बिघडल्यानं त्यांनी राजकारणातून काही क्षणांची विश्रांती घेतलीये, पण त्यांच्यातल्या पत्रकारानं नाही. याच धडाडीच्या पत्रकाराची लेखणीरुपी तलवार हॉस्पिटलमध्ये असतानाही तळपतीये.

Vinod Patil

संजय राऊत म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बुलंद तोफ. शिवसेना फुटल्यानंतर पक्षावर आणि पक्षप्रमुखांवर विरोधकांनी केलेला प्रत्येक वार आपल्या रोखठोक, तर कधी मिश्किल शैलीत त्यांनी परतवून लावलाय. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ही तोफ गावागावात धडाडेल असं वाटलं असतानाच, लढवय्या संजय राऊतांना आजारानं गाठलं. त्यामुळं सध्या ते राजकारणापासून दूर आहेत. राजकीय तोफ थंडावलीये, पण हाडाचे पत्रकार असलेल्या राऊतांची लेखनरूपी तलवार तळपतीये.

आणि त्यामुळेच हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाही त्यांनी आपली लेखणी थांबवलेली नाही. कारण त्यांच्यातला पत्रकार त्यांना स्वस्थ बसू देत नाहीये. म्हणून त्यांनी एक भावनिक पोस्ट टाकलीय. आपल्य़ा पोस्टमध्ये काय म्हटले आहेत ते पाहूयात. संजय राऊत बरे व्हावेत, अशी प्रार्थना कुटुंबीय, नातेवाईक, सहकारी आणि इतकंच काय तर राजकीय विरोधकही त्यांच्यासाठी प्रार्थना करताहेत. आजपर्यंत असंख्य संकटं आली. संजय राऊत लढवय्याप्रमाणे लढले. कधी अपयश आलं तरी खचले नाहीत. तर पुढे चालतच राहिले. असा हा नीडर माणूस या आजारालाही पळवून लावेल आणि पुन्हा त्यांची मुलुखमैदानी तोफ धडाडेल, याच त्यांना शुभेच्छा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राणेंचं स्टिंग ऑपरेशन, महायुतीची पोलखोल, भाजप कार्यकर्त्याच्या घरात पैशांची बॅग

नोकरी सोडल्यानंतर किती दिवसांत फुल अँड फायनल सेटलमेंटची रक्कम मिळणार? जाणून घ्या नव्या कामगार कायद्याचे नियम

Mahavatar Narsimha: 'महावतार नरसिंह' ऑस्करच्या शर्यतीत; 'डेमन हंटर्स'सह 'या' पाच चित्रपटांना देणार टक्कर

पालिका निवडणुकीतही 50 खोके, भाजप आमदाराच्या दाव्यानं खळबळ

Maharashtra Live News Update: पुण्यात विवाहित महिलेची आत्महत्या

SCROLL FOR NEXT