Sanjay Gaikwad Saam Tv
महाराष्ट्र

Buldhana News: गद्दार दिन साजरा केल्याने ठाकरे गट जिल्हा संघटकाला धमकी; आ. संजय गायकवाड यांची ऑडिओ क्लिप व्हायरल...

MLA Sanjay Gaikwad News: रात्रीच्या सुमारास फोन करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची ऑडिया क्लिप सध्या व्हायरल होत आहे.

Gangappa Pujari

संजय जाधव, प्रतिनिधी...

Maharashtra Political News: एकनाथ शिंदे यांच्या बंडाला २० जून रोजी एक वर्ष पूर्ण झालं आहे. महाविकास आघाडीकडून २० जून हा जागतिक गद्दार दिन जाहीर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनानंतर राज्यात अनेक भागात गद्दार दिन शिवसेनेच्या कार्यकर्त्याकडून साजरा करण्यात आला होता.

याबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला असून गद्दार दिन साजरा केला म्हणून उद्धव गटाच्या जिल्हा संघटकाला आ.संजय गायकवाड यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. (latest maharashtra political news in marathi )

काय आहे संपूर्ण प्रकरण...

याबाबत अधिक माहिती अशी की, २० जून हा जागतिक गद्दार दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन शिवसेनेच्या (Shivsena) उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) गटाकडून करण्यात आल होते. त्या नुसार बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी उद्धव गटाकडून ठिकठिकाणी हा दिवस कुठे गद्दार दीन तर कुठे खोके दिवस म्हणून साजरा करण्यात आला.

अनेक ठिकाणी समाज माध्यमांवरही यासंबंधी अनेक मेसेज करण्यात येत होते. असाच एक मेसेज टाकल्यामुळे बुलढाण्याचे (Buldhana) शिंदे गटाचे आ.संजय गायकवाड यांनी जिल्ह्याचे उद्धव गटाचे संघटक प्रा.सदानंद माळी यांना धमकी दिल्याचे समोर आले आहे. रात्रीच्या सुमारास फोन करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची ऑडिया क्लिप सध्या व्हायरल होत आहे. ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

या ऑडिओ क्लिपमध्ये "तुम्हाला फिरणे मुश्किल करून टाकेल, तुमचं जगणं मुश्किल होईल , तुमचं राजकारण संपवून टाकेल.. अशी धमकी दिल्याचा आरोप प्रा.सदानंद माळी यांनी केला आहे. या प्रकरणी आज महाविकास आघाडीतर्फे जिल्हा पोलिस अधिक्षकांना निवेदन देऊन संरक्षण देखील मागितले आहे.

या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून यावर संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.. (Maharashtra Politics)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लातूर-तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू|VIDEO

पुण्यात मतदारयादीत मोठा घोळ; 15 हजार मतदारांची नावं पुण्याबाहेर ट्रान्सफर?

NCPचं विलिनीकरण नको! स्वतंत्रपणे सत्तेत जाऊ, शरद पवार गटात वेगळीच चर्चा; राजकीय समीकरणांना नवं वळण

मुंबईकरांनो, तुम्ही भाड्यानं राहताय...; घराचा ताबा न सोडल्यास दुप्पट घरभाडं

अमरावती नगरपरिषदेच्या इमारतीवर मटण पार्टी; जिल्हाधिकाऱ्यांचा मुख्याधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा

SCROLL FOR NEXT