Thackeray Group Campaign saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'होऊ द्या चर्चा'; ठाकरे गट करणार सरकारी योजनांचा भंडाफोड

Thackeray Group Campaign: उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या मोहिमेची सुरुवात छत्रपती संभाजीनगर येथून करण्यात येणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

Thackeray Group Campaign Hou Dya Charcha: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच विदर्भ दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी शिवसैनिकांना लोकांना 'होऊ द्या चर्चा' उपक्रम राबवण्याचे आवाहन केले होते. या चर्चेतून सरकारी योजना खरंच तुमच्यापर्यंत पोहोचल्या का याची चर्चा करा असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी लोकांना केले होते. आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या मोहिमेची सुरुवात छत्रपती संभाजीनगर येथून करण्यात येणार आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून 'होऊ द्या चर्चा' उपक्रम राबवत गावात कट्ट्यावर आणि बांधावर सरकारी योजना तुमच्यापर्यंत पोहोचल्या का याबाबत आपापसात चर्चा करण्याचे आवाहन जनतेला करण्यात आले आहे. या मोहिमेच्या माध्यामातून ठाकरे गटाकडून राज्य सरकारच्या योजनांचा भांडाफोड करण्यात येणार आहे. (Tajya Marathi Batmya)

ठाकरे गटाकडून सरकारच्या शासन आपल्या दारी योजना आणि इतर सरकारी योजनांच्या आणि आश्वासनांचा भांडाफोड करण्यासाठी 'होऊ द्या चर्चा' उपक्रम राबवला जाणार आहे. ठाकरे गटाचे आमदार, खासदार आणि महत्त्वाचे नेते या उपक्रमांतर्गत मतदारांपर्यंत पोहोचून सरकारच्या योजनांचा भांडाफोड करणार असल्याचं सांगितलं जातंय. (Latest Political News)

एकीकडे राज्य सरकार आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे ठाकरे गट याच योजनांचा भांडाफोड मतदारांसमोर करणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार उद्यापासून संभाजीनगरमध्ये या उपक्रमाला सुरुवात होणार आहे. यात शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे मतदारांपर्यंत पोहोचून त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Station : कृपया प्रवाशांनी लक्ष द्या! अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव बदललं, नवीन नाव काय? जाणून घ्या

मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे फाईल बाहेर काढणाऱ्या अंजली दमानियांच्या पतीवर सरकार खूश; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Cat Worshipped As Goddess: 'या' देशात मांजरींची होते देवाप्रमाणे पूजा; भक्त अर्पण करायचे सोन्याचे दागिने

Dhananjay Munde : बंजारा-वंजारा एकच? धनंजय मुंडेंच्या विधानानं वाद पेटला, वाचा स्पेशल रिपोर्ट

OBC Reservation : कुणबी बोगस प्रमाणपत्रांची सखोल पडताळणी होणार; मंत्री बावनकुळे यांच्यांकडून प्रशासनाला आदेश

SCROLL FOR NEXT