किरीट सोमय्या  दिलीप कांबळे
महाराष्ट्र

ठाकरे सरकार केवळ भ्रष्टाचार करणारे सरकार - किरीट सोमय्या

मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या गौण खनिज उत्खननाची प्रत्यक्ष पाहणी आज भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. आंबळी गावाशेजारी गौण खनिज उत्खनन होत असून अवैधरित्या होणारे हे उत्खनन आमदार सुनील शेळके यांची कंपनी करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

दिलीप कांबळे

मावळ : महाविकास आघाडी प्रणीत ठाकरने सरकार सत्तेत आल्यापासून केवळ भ्रष्टाचार करण्याचे काम केले असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. कोरोना काळात योग्य नियोजन करण्यात हे सरकार अयशस्वी ठरले आहे. आताही कोणत्याच प्रकारचे नियोजन सरकार करत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रोज नवीन निर्णय घेऊन ते रद्द करण्याचे काम सध्या ठाकरे सरकारकडून सुरू असल्याचा आरोप सोमय्या यांनी मावळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

हे देखील पहा -

मावळात सुरू असलेल्या बेकायदा गौण खनिज उत्खनन प्रकरणाची चौकशी व्हावी - किरीट सोमय्या

मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या गौण खनिज उत्खननाची प्रत्यक्ष पाहणी आज भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. मावळ मधील आंबळी गावाशेजारीच असलेल्या धरणापासून 100 फूट अंतरावर गौण खनिज उत्खनन होत असून अवैधरित्या होणारे हे उत्खनन मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांची कंपनी करत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.

या उत्खननाची प्रत्यक्ष पाहणी करून किरीट सोमय्या यांनी मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांची भेट घेतली. मावळ तालुक्यात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खननाची माहिती घेऊन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी तहसीलदारांकडे केली आहे. या उत्खननाबाबत किरीट सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री अश्विनी कुमार चौबे यांच्याकडे तक्रार दाखल केली असून त्यांच्याकडे देखील याप्रकरणाची चौकशीची मागणी केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद वाढली; काँग्रेस- ठाकरे गटातील कार्यकर्त्यांची एकनाथ शिंदेंना साथ

Election Commission: 'मतचोरीच्या खोट्या आरोपांना निवडणूक आयोग घाबरत नाही',: मुख्य निवडणूक आयुक्त

Vaishno Devi Yatra: वैष्णो देवीची यात्रा पूर्णपणे थांबवली, भाविकांना परत जाण्याचे आवाहन; नेमकं कारण काय?

Maharashtra Live News Update: पेशवे जयंतीनिमित्त रॅली मध्ये सहभाग घेत खासदार मेधा कुलकर्णी यांनी चालवली दुचाकी

Priya Bapat: प्रिया बापटचा स्पेशल बॉसी लूक; लवकरच झळकणार नव्या भूमिका

SCROLL FOR NEXT