ठाकरे सरकारला एसटी कर्मचाऱ्यांपेक्षा आर्यन खानची जास्त काळजी- गोपीचंद पडळकर twitter/@GopichandP_MLC
महाराष्ट्र

ठाकरे सरकारला एसटी कर्मचाऱ्यांपेक्षा आर्यन खानची जास्त काळजी- गोपीचंद पडळकर

ड्रग्ज आणि गांजा तस्करी करणाऱ्या माफियांचे मागे सरकार

भारत नागणे

पंढरपूर : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. अशा वेळी ठाकरे सरकार मधील एक ही मंत्री एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचे अश्रू पुसण्यासाठी गेले नाहीत. मात्र, हेच मंत्री आर्यन खानची काळजी घेण्यामध्ये व्यस्त आहेत. असा टोला आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपुरात ठाकरे सरकारला लगावला आहे.

हे देखील पहा-

गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलन सुरू आहेत. याच प्रश्नावर काल पासून राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. परंतु, राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांमध्ये फूट पाडून संप मोडीत काढला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव या ठिकाणी एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे.‌ आतापर्यंत राज्यात अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केले आहेत.

मात्र, आत्तापर्यंत एक ही राज्य सरकारचा मंत्री आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेण्यासाठी गेलेला नाही. त्यांना कोणतीही मदत केली नाही, असे असताना दुसरीकडे मात्र ठाकरे सरकार मधील मंत्री ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या आर्यन खानच्या सुटकेबाबत प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे. सरकार ड्रग्ज आणि गांजा माफियांच्या मागे असल्याचा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज पंढरपुरात पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे.

Edited By- digambar jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Turichya Danyachi Bhaji Recipe : गावाकडे बनवतात अगदी 'तशी' तुरीच्या दाण्याची भाजी, वाचा सिंपल रेसिपी

Weather Alert : नववर्षाच्या दुसऱ्या दिवशीही पाऊस, मुंबईसह अनेक भागांत कोसळल्या सरी; गारठा कायम राहण्याचा अंदाज

Rinku Rajguru : कातिल अदा अन् घायाळ करणारी नजर; रिंकू राजगुरूनं केली जबरदस्त लावणी, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: नागपुरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, संजय सरायकर यांचा भाजपमध्ये प्रवेश

Ladki Bahin Yojana: नोव्हेंबरचा हप्ता आला, आता लाडक्या बहिणींना डिसेंबर-जानेवारीचे ₹३००० एकत्र येणार?वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT