Tensions rise between Uddhav Thackeray and Raj Thackeray after MNS leader’s controversial remark following BMC elections. Saam Tv
महाराष्ट्र

‘कोत्या मनाची प्रवृत्ती’ कोणावर? मनसेच्या स्टेटसनं ठाकरे युतीत खळबळ

Rift Between Uddhav And Raj Thackeray: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर महिनाभरातच ठाकरे बंधूंमध्ये दुरावा येण्यास सुरुवात झालीय...कारण मनसे नेत्यानं ठाकरेसेनेबद्दल कोत्या मनाची प्रवृत्ती असा उल्लेख केलाय...मात्र हा नेता कोण... आणि त्यावरुन कसं राजकारण तापलंय...

Bharat Mohalkar

निवडणुकीआधी एकीची घोषणा देणाऱ्या ठाकरे बंधूंमध्ये निवडणुकीनंतर आता दुरावा वाढत चाललाय.. महापालिका निवडणुकीत मनसेच्या वाट्याला आलेलं अपयश आणि आता स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीतही मनसेला डावलण्यात आल्यानं मनसेनं ठाकरेसेनेला डिवचलंय.. हे स्टेटस नीट पाहा.... कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून कधीही स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये, असं व्हॉट्सअप स्टेटसच मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंनी ठेवलंय... त्यावरुन आता ठाकरेसेनेनं संतप्त प्रतिक्रिया दिलीय... तर युती दोन भावांची झाल्यानं त्याबद्दल राज ठाकरे भूमिका मांडतील, असं मत मनसे नेते अविनाश अभ्यंकरांनी मांडलंय...

खरंतर हिंदीसक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र आले होते... त्यानंतर 4 महिन्यांनी ठाकरेंनी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर युती केली..ठाकरे सेना आणि मनसेची युती तर झाली मात्र निवडणुकीतील जागा वाटपावरुन नाराजीनाट्य रंगलं होतं. ठाकरेंनी मनसेला 53 जागा दिल्या होत्या.. त्यातील फक्त 6 जागाच राखता आल्या... तर ठाकरेसेनेनं 164 जागा लढवल्या होत्या..त्यापैकी 65 जागांवर ठाकरेसेनेचा विजय झाला...

महापालिकेच्या निवडणुकीत मनसेची कामगिरी निराशाजनक झाली. यश न मिळाल्याने मनसेत धुसफूस आहे.. त्यातच आता ठाकरेसेनेच्या वाट्याला आलेल्या 3 स्वीकृत नगरसेवकपदासाठीही मनसेला डावललं जात असल्यानं ठाकरेंच्या युतीत संघर्षाची ठिणगी पडलीय.. मात्र नरेंद्र जाधव समितीचा त्रिभाषा समितीसंदर्भातील अहवाल येण्याच्या तोंडावर ठाकरे बंधूंमध्ये फूट पडल्यास त्याचा फटका मराठी भाषेला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा ठाकरे राजकीय महत्वाकांक्षा बाजूला ठेवून मराठीसाठी एकीचा नारा देणार की २० वर्षानंतर एकत्र आलेल्या ठाकरेंमध्ये पुन्हा दुरावा निर्माण होणार.? याकडे राज्याचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात पावसाला सुरूवात

Maharashtra politics : ठाकरे-फडणवीसांची जवळीक, सामंतांनी थेट निशाणा साधला, स्टेट्‍सची राजकीय वर्तुळात चर्चा

Welcome To The Jungle: 'वेलकम टू द जंगल'ची दमदार सुरुवात! अक्षय कुमारच्या मल्टीस्टाररने पहिल्याच दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

Mumbai Local Train : मुंबई लोकलचा नवा नियम! आता दारू पिऊन प्रवास करणाऱ्यांची खैर नाही, थेट खिशाला बसणार कात्री

Gold Rate Today: एका रात्रीत सोन्याच्या भावात मोठी वाढ, 10 तोळे सोनं ₹12000 ने महाग, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

SCROLL FOR NEXT