Sanjay Raut addressing media on Mumbai mayoral strategy — political alliance in focus Saam Tv
महाराष्ट्र

Maharshtra Politics: मनसे की ठाकरेसेना, मुंबईत महापौर कोणाचा? ठाकरेंचा पाच महापालिकांचा फॉर्म्युला ठरला?

Mumbai Municipal Corporation: एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा रंगलेली असताना आता ठाकरेसेनेच्या खासदारानं थेट मुंबईच्या महापौर पदाबाबत मोठं विधानं केलयं.. त्यामुळे मुंबईचं महापौर पद कोणता पक्ष बळकावणार? ठाकरे बंधूंचा महापालिकांसाठीचा फॉर्म्यूला काय आहे?

Suprim Maskar

ऐकलतं... राऊतांच्या या विधानामुळे ठाकरे बंधूंच्या युतीवर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे.... गेल्या तीन महिन्यात ठाकरे बंधूंच्या 5 वेळा भेटी झाल्या आहेत. ५ ऑक्टोबरला अचानक मातोश्रीवर गेलेल्या राज ठाकरेंनी बंद दाराआड उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. ही चर्चा ४० मिनिट चालली. आणि त्यानंतर राऊतांनी थेट मुंबईच्या महापौर पदाचा फॉर्म्युलाच जाहीर केला.

राज ठाकरेंच्या मातोश्रीवरील बैठकीनंतर पहिल्यांदाच राऊतांच्या विधानामुळे मनसे आणि ठाकरेसेना कुठल्या महापालिका एकत्र लढणार, हे समोर आलयं... ठाकरे बंधू मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, नाशिक या महापालिका एकत्र लढवणार असल्याचे राऊतांचे संकेत

दरम्यान या महापालिकांची सद्यस्थिती काय आहे आणि एकत्र आल्याचा किती फायदा या महापालिकेत दिसेल. मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.. मात्र

शिवसेनेच्या फुटीमुळे मराठी मतं विखुरलेत. अशावेळी मनसे आणि ठाकरेसेनेची युती महायुतीसमोर आव्हान उभं करेल... त्याशिवाय कल्याण- डोंबिवली, ठाणे महापालिकेत शिंदेंसेनेची ताकद जास्त आहे.. मात्र ठाणे आणि कल्याण ग्रामीणमध्ये मनसे आव्हान उभं करू शकत .तर पुण्यात भाजपाची ताकद जास्त आहे. ठाकरेसेना आणि मनसेची ताकद पुण्यात तुलनेनं कमी आहे. तसचं नाशिकमध्ये शिंदेसेना आणि भाजप वरचढ असली तरी मनसे आणि ठाकरेसेनेच्या युतीचा फायदा नाशिकमध्ये होईल.

दुसरीकडे राऊतांच्या महापौर पदाच्या विधानानंतर सत्ताधारीही आक्रमक झालेत...मुंबई महापालिकेवर फक्त महायुतीचा महापौर बसणार, असं विधान सत्ताधाऱ्यांनी केलयं...दरम्यान महाविकास आघाडीचं अस्तित्वही कायम राहणार असल्याचं राऊत सांगितलयं. त्यामुळे मविआतील घटक पक्षांना न दुखावता.. मुंबईसह इतर चार महापालिकांचा गड काबीज करण्यासाठी ठाकरे बंधू कशी रणनिती आखतात.. याकडे विरोधकाचं लक्ष लागलयं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Govinda: बायकोच्या 'त्या' विधानावरून अभिनेता गोविंदानं मागितली सार्वजनिक माफी, काय आहे प्रकरण?

नाशिकमध्ये तब्बल 3 लाख दुबार मतदार; बोगस मतदारविरोधात शिंदेसेनाच मैदानात

Election Commission: नगर परिषद, नगर पंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील?

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

SCROLL FOR NEXT