Police investigation reveals large-scale TET paper leak racket involving 27 accused, including links to a former district office bearer of Bharatiya Janata Party. saam tv
महाराष्ट्र

TET Exam: भाजपच्या माजी जिल्हा उपाध्यक्षाच्या २ सख्ख्या भावांनी फोडला TET चा पेपर; २७ जणांच्या नाड्या आवळल्या

TET Paper Leak Case: टीईटी परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात पोलिसांना मोठं यश मिळाले आहे. भाजपच्या माजी जिल्हा उपाध्यक्षाच्या भावांसह २७ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

Bharat Jadhav

  • TET परीक्षा पेपरफुटी प्रकरणात मोठा खुलासा

  • २७ जणांविरुद्ध पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल

  • भाजपच्या माजी जिल्हा उपाध्यक्षांचे दोन भाऊ आरोपी

शिक्षक पात्रता परीक्षा TET चा पेपर फुटल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. २७ जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्षांच्या दोन्ह भाऊ सहभागी असल्याचं उघडकीस आले आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये हा पेपर फुटीचा प्रकार उघडकीस आला होता. तपासादरम्यान या गैरप्रकाराची साखळी थेट बिहारपर्यंत पोहोचल्याचे समोर आलंय. दरम्यान काही परराज्यातील तरुण फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

सोनगे (ता. कागल) येथील एका फर्निचर कारखान्यात TET चा पेपर फोडण्याची तयारी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीनंतर पोलिसांनी २२ नोव्हेंबर रोजी तेथे छापा टाकला. या छाप्यात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या. काही परीक्षार्थींनाही पेपर आधीच मिळाल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणात कराड तालुक्यातील बेलवाडी येथे करिअर अकॅडमी चालविणारे महेश गायकवाड आणि त्यांचा भाऊ संदीप गायकवाड यांची नाव याप्रकरणी पुढे आली.

हे दोघे सातारा जिल्ह्यातील भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद भगवान गायकवाड यांचे सख्खे भाऊ आहेत. त्यामुळे या प्रकरणाला आता राजकीय रंगही चढलाय. या प्रकरणाच्या तपासात बिहारमधील रितेशकुमार आणि महंमद साहिद अझहर हुसेन यांची नावेही उघड झाली आहेत. या संपूर्ण प्रकरणात शिक्षक, क्लास चालक, तसेच इतर संबंधित अशा एकूण २८ संशयितांचा समावेश आहे.

कोल्हापुरात रॅकेटचा पर्दाफाश

कोल्हापूर ग्रामीण पोलिसांनी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपर लीक करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी होणाऱ्या परीक्षेच्या एक दिवस आधी ही टोळी सक्रिय झाली होती. पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत अनेक आक्षेपार्ह साहित्य जप्त केले होते. आरोपींनी २३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर परीक्षेच्या आदल्या रात्री देण्याचे आमिष काही उमेदवारांना दाखवले होते. या उमेदवारांकडून त्यांनी मूळ शैक्षणिक कागदपत्रे आणि मोठ्या रकमेची मागणी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Waking up at 3am: रात्री नेमकी ३ वाजताच जाग येते? कारणं जाणून घ्या आत्ताच

Maharashtra News Live Update: बारामती-राहुरी पोटनिवडणूक सार्वजनिक सुट्टी, सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय

Bollywood Couple Pregnant: पुन्हा गोड बातमी! बॉलिवूड स्टार कपलच्या घरी 'बेबी नं. 2'ची चाहूल

Bigg Boss Marathi 6 : थेट घराबाहेर पडणार 'हा' सदस्य, टॉप ५ च्या शर्यतीतून विजेतेपदाचा तगडा स्पर्धक OUT

Gold Price Today: अक्षय्य तृतीयेला सोनं महागलं की स्वस्त झालं? खरेदीआधी किंमत घ्या जाणून

SCROLL FOR NEXT