Nashik Student Bus Accident Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Accident: नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या बसचा भीषण अपघात

नाशिकमध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे.

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक: नाशिकमध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात (Nashik) झाला आहे. बस आणि ट्रक यांच्यामध्ये हा अपघात झाला असल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातामध्ये २० ते २५ विद्यार्थी जखमी (Students) झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. नाशिक (Nashik)- औरंगाबाद रोडवर (Nashik Aurangabad) हा अपघात झाला आहे. (Nashik Accident News Udpates)

हे देखील पहा-

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक औरंगाबाद रोडवर मेडिकल कॉलेजच्या (college) स्टाफ बसचा भीषण अपघात झाला आहे. मेडिकल (Medical) कॉलेज मधील शिकाऊ डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात झाला आहे. बस पलटी होऊन झालेल्या या अपघातामध्ये २० ते २५ जण जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे.

बसच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. बस आणि ट्रक यांच्यात समोरा- समोर अपघात झाला आणि त्यानंतर बस पलटली झाली आहे. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. या अपघातात जखमी झालेल्यांना उपचाकरिता खाजगी आणि पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पावसाळ्यात कोणती सनस्क्रीन वापरायची?

Maharashtra News Live Update: जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार

Bone cancer symptoms: हाडं सतत दुखतायत म्हणून दुर्लक्ष करताय? डॉक्टरांनी सांगितली बोन कॅन्सरची सुरुवातीची चार महत्त्वाची लक्षणं

Ahilyanagar Crime: मंदिरातील बाथरूममध्ये साधूचं नको ते कृत्य, नग्न अवस्थेत महिलेसोबत आढळला; अहिल्यानगरमध्ये खळबळ

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! तुमचाही पगार दुप्पट होणार? लाभार्थ्यांची संपूर्ण यादी आली समोर

SCROLL FOR NEXT