Exam Saam TV
महाराष्ट्र

All The Best! आजपासून दहावीची परीक्षा सुरू

आठ लाख ८९ हजार ५८४ विद्यार्थी आणि सात लाख ४९ हजार ४७८ विद्यार्थिनी परीक्षा देणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे - दहावीची बोर्डाची लेखी परीक्षा (Exam) आजपासून सुरू होत आहे. या परीक्षेला १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. राज्यातील तब्बल २१ हजार ३८४ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. यामध्ये आठ लाख ८९ हजार ५८४ विद्यार्थी आणि सात लाख ४९ हजार ४७८ विद्यार्थिनी आहेत. तसेच विद्यार्थ्यांना ७० ते १०० गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी ३० मिनिटे जादा वेळ देण्यात येणार आहे. तर ४० ते ६० गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी १५ मिनिटे जादा वेळ देण्यात येणार आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथके, महिलांची विशेष पथके स्थापन करण्यात आले आहे. नियोजित वेळेपूर्वी १० मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहे.

हे देखील पहा -

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. मात्र यंदा करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य मंडळाने प्रत्यक्ष परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बारावीची परीक्षा ४ मार्चपासून सुरू झाली आहे, तर आजपासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे.

करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून परीक्षा घेण्यात येणार आहे.. त्यामुळे परीक्षा केंद्रावर करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर एक तासापुर्वीच पोहचणं गरजेचं असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : मोदी सरकार ज्ञानेश कुमारांना वाचवत आहे - राहुल गांधी

SIR Update : SIR प्रक्रियेबाबत महत्त्वाची अपडेट! 'या' तारखेला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार; जाणून घ्या A to Z माहिती

Maharashtra News Live Update: राज ठाकरे यांची शिवतीर्थावर नेत्यांची बैठक

New Pension Rule: EPS पगार मर्यादा 25,000 रुपये; पण सर्वांनाच पेन्शन मिळणार नाही! जाणून घ्या नवे नियम

White Saree For Womens: महिलांसाठी पांढऱ्या रंगाच्या साड्यांचे सुंदर कलेक्शन, या 5 डिझाईन्स नवरात्रीसाठी बेस्ट

SCROLL FOR NEXT