Crime News Saam tv
महाराष्ट्र

Sindhudurg: कणकवली-तळेरेत १० दुकाने फाेडली; ४ लाख ५० हजार रूपये लंपास

चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान पाेलिसांसमाेर निर्माण झाले आहे.

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग (sindhudurg) जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून सलग दुसऱ्या दिवशी चोरट्यांनी कणकवली-तळेरे (kankavali) येथे मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी चोरी करत तब्बल दहा दुकाने फोडली आहेत. यात चोरट्यांनी चार लाख पन्नास हजार रूपयांची रोकड लंपास केली आहे. (sindhudurg latest marathi news)

शनिवारी चोरट्यांनी कणकवलीच्या बाजुला असलेल्या वैभववाडी तालुक्यात सात दुकानांसह दोन घरे फोडली होती. यात वैभववाडी (vaibhavwadi) तहसीलदारांच्या शासकीय बंगल्याचा ही समावेश होता.

तर रविवारी चोरट्यांनी तब्बल दहा दुकाने फोडून जबरी चोरी केली आहे. सलग दुसर्‍या दिवशी बाजारपेठेत घडलेल्या चोरींच्या घटनांमुळे खळबळ उडाली असून व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलीसांसमोर (police) चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kombdi Vade Recipe : गटारी स्पेशल मेजवानी! मालवणी कोंबडी वड्यांची रेसिपी, चव अशी की घरचे बोटं चाटत राहतील

Abhijeet Dipke : अभिजित दिपके राजकीय पक्ष स्थापन करणार? पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Lizard : या ५ ट्रिक्स वापरा; घरातील पाली होतील कायमच्या गायब!

Police Transfer : पोलिस दलात मोठा फेरबदल, ३९ पोलिसांची तडकाफडकी बदली; नावं अन् धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT