tuljabhavani mandir saam tv
महाराष्ट्र

Tuljabhavani Mandir : नवरात्रौत्सवात तुळजाभवानी देवीचं मंदिर २२ तास खुलं राहणार, कसं असेल वेळापत्रक?

Navratri Festival 2023 in Tuljapur: तुळजाभवानी देवीच्या नवरात्र काळात पूजा व दर्शन वेळेत बदल करण्यात आला आहे.

प्रविण वाकचौरे

बालाजी सुरवसे

Dharashiv News :

नवरात्रौत्सव महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून आणि देशभरातून भाविक धाराशीवमध्ये येतात. नवरात्रौत्सवात ९ दिवस भाविकांचा मोठी गर्दी दर्शनासाठी असते. तुळजाभवानी देवीच्या भाविकांसाठी दिलासादायक माहिती समोर आली आहे.

13 व 14 ऑक्टोबर रोजी भवानी ज्योत येणार आहे. 15 ते 24 ऑक्टोबर नवरात्रौत्सव असल्याने तसेच 28 ते 30 ऑक्टोबर काळात अश्विन पौर्णिमा असल्याने वेळेत बदल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

नवरात्रौत्सव काळात व पौर्णिमेला तुळजाभवानी मातेचे मंदिर 22 तास दर्शनासाठी खुले राहणार आहे. तुळजाभवानी देवीच्या नवरात्र काळात पूजा व दर्शन वेळेत बदल करण्यात आला आहे.

मंदिर रात्री 11 वाजता बंद होऊन पहाटे 1 वाजता चरणतीर्थ होऊन दर्शनासाठी उघडले जाणार आहे. अभिषेक पूजा ह्या सकाळी 6 ते 10 व सायंकाळी 7 ते 9 या वेळेत संपन्न होतील. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने याबाबत जाहीर प्रकटन काढले आहे.

नाशिकचं सप्तश्रृंगी मंदिरही २४ तास खुलं राहणार

नवरात्रौत्सव काळात सप्तशृंगी देवीच मंदिर भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुलं ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. १५ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर दरम्यान मंदिर भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुलं राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणुकीत ठाकरेंचा पराभव, एकनाथ शिंदे म्हणाले... | VIDEO

Khandeshi Puranpoli Recipe : खानदेशी पुरणपोळी 'मांडे', बैलपोळ्यासाठी खास गोड पदार्थ

Sprouts Curry : पावसाळ्यात भाजी कोणती करावी सुचत नाही? बनवा मिक्स कडधान्याची उसळ

Maharashtra Rain Live News : कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्या निषेधार्थ राहाता येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन

Accident : तिचा हात १०-१२ फुटांवर पडला, सरकत-सरकत...; अभिनेत्रीच्या अपघाताची घटना मन सुन्न करणारी

SCROLL FOR NEXT