Nashik Crime News  Saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime News : अंमली पदार्थ तस्करीत शिंदे गटाच्या माजी महिला पदाधिकारी, तेलंगणा पोलिसांनी केली अटक

Nashik Crime News in Marathi : अंमली तस्करी प्रकरणी शिंदे गटाच्या माजी महिला पदाधिकाऱ्याला पंचवटीतून अटक करण्यात आली आहे. तेलंगणा पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी तेलंगणा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी तेलंगणा पोलिसांनी शिंदे गटाच्या माजी महिला पदाधिकाऱ्याला अटक केली आहे. तेलंगणा पोलिसांनी लक्ष्मी ताठे आणि तिच्या मुलाला पंचवटी परिसरातून अटक केली आहे.

अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी तेलंगणा पोलिसांनी जूनमध्येही कारवाई केली होती. तेलंगाणाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने जून महिन्यात 190 किलो गांजा पकडला होता. त्यानंतर तेलंगणा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीनं तेलंगणा पोलिसांनी लक्ष्मी ताठे आणि मुलाला अटक केली आहे.

तेलंगणा पोलिसांनी दोघांना अटक केल्यानंतर त्यांना घेऊन तेलंगणाला रवाना होणार आहेत. लक्ष्मी ताठेची या आधीच पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, त्यामुळे तिच्याशी काही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण शिंदे गटाने दिलं आहे.

स्वस्त सोन्याचे आमिष दाखवून अपहरण करून लुटणारी टोळी जेरबंद

पोलीस असल्याची बतावणी करुन एका व्यापाऱ्याची 13 लाखांची लूट करणाऱ्या टोळीला नवी मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. सोशल मीडियावरील जुजबी ओळखीतून आरोपीने फिर्यादीला सुमारे ३० लाख रुपयांचे सोने १३ लाख रुपयांत देण्याचे आमिष दाखवले होते.

या अमिषाला बळी पडत व्यापारी खारघरला गेला. त्यानंतर आरोपीने स्वतःला पोलीस असल्याची बतावणी केली. त्यानंतर व्यापाऱ्याचे अपहरण करुन 13 लाख रुपयांची लूट केली होती. या प्रकरणी गुन्हे शाखेने सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपास करत 7 आरोपींना कल्याण डोंबिवली भागातून अटक केली आहे. त्यांच्याकडून लुटीची 12 लाख 27 हजार इतकी रोकड हस्तगत करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; भरधाव कंटेनरनं २० गाड्यांना उडवलं, ४ जणांचा मृत्यू, VIDEO समोर

Shocking : लग्न करण्यास नकार दिल्याने हत्या, प्रसिद्ध कंटेंट क्रिएटरला विष देऊन संपवलं

Periods and Shravan : मासिक पाळीत श्रावणाचा उपवास करावा की नाही?, जाणून घ्या वैज्ञानिक कारणे

Maharashtra Live News Update: "भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय"; अनिल गोटेंचा सरकारवर घणाघात

Viral Video : धावती कार डिव्हायडरला धडकली अन् चार वेळा गरगरा फिरली, अपघाताचा भयंकर व्हिडिओ

SCROLL FOR NEXT