school Saam tv
महाराष्ट्र

Kolhapur News : परीक्षेच्या पेपरवर जय श्री राम लिहिले, शिक्षकाने विद्यार्थ्यास हटकले; हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांपाठाेपाठ काेल्हापूर पाेलिस शाळेत दाखल

Hindutvawadi Organisations : शाळेत गाेंधळ निर्माण हाेऊ नये यासाठी पाेलिस आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur Breaking News : परीक्षेचा पेपरवर जय श्री राम लिहले म्हणून विद्यार्थ्यास शिक्षिकेने हटकल्याचा प्रकार काेल्हापूर जिल्ह्यातील एका शाळेत घडला. हा प्रकार हिंदुत्ववादी संघटनांना समजल्यानंतर संबंधित शाळेनजीक हिंदुत्ववादी कार्यकर्ते एकटवले. (Maharashtra News)

काेल्हापूरातील एका शाळेत इंग्रजी विषयाची परीक्षा हाेती. एका विद्यार्थ्याने पेपरवर जय श्री राम असे लिहिले. हे शिक्षकाने पाहिल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यास श्रद्धा मनात ठेवा पेपर वर लिहू नका असे म्हणत हटकले. यामुळे विद्यार्थी हिरमुसला.

दरम्यान विद्यार्थ्यास (students) हटकल्याची माहिती हिंदुत्ववादी संघटनांपर्यंत पाेहचली. या प्रकाराची माहिती घेण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते संबंधित शाळेच्या आवारात एकवटले. त्यामुळे काही जणांनी पाेलिसांनी याची माहिती दिली. तातडीने पोलिस देखील शाळेत दाखल झाले.

सध्या शाळा व्यवस्थापन, हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि पाेलिस (police) यांच्यात चर्चा सुरु असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

Rava Puri Recipe : टिफीनमध्ये रोज चपाती कशाला? झटपट करा कुरकुरीत बटाटा पुरीचा नाश्ता

विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! खणखणीत भाषनानंतर राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना टाळी, दोघेही खळखळून हसले, पाहा video

SCROLL FOR NEXT