nagar, tea saam tv
महाराष्ट्र

Tea : चहाप्रेमींनाे ! साेन्याच्या कपात चहा प्यायचाय ? (व्हिडिओ पाहा)

दाेन वर्षांपासूनची कल्पना चहा विक्रेत्यानं सत्यात उतरवली.

सचिन आगरवाल

Nagar Latest Marathi News : सोन्याच्या कपात चहा...आश्चर्य वाटतंय ना...हाेय हे खरं आहे. नगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यात प्रेमाचा चहा मिळतोय ताे ही आता सोन्याच्या कपात. या साेन्याच्या कपाची चर्चा संपुर्ण नगर जिल्ह्यात हाेऊ लागली आहे. विशेष म्हणजे आर्मी आणि महाराष्ट्र पोलीस यांच्यासाठी चहाविक्रेते १२ महिने मोफत चहा देतात.

सकाळ झाली की प्रत्येकाला हवा असतो तो चहा...चहा हा प्रत्येकाचा तसा आवडता विषय. दिवसभरात एक तर कप चहा होतोच. पण हाच चहा जर खऱ्या खुऱ्या सोन्याच्या कपात मिळाला तर. पारनेर (parner) तालुक्यातील स्वप्नील पुजारी यांनी आपल्या दुकानात सोन्याच्या कपातून ग्राहकांना चहा देण्याची सुविधा सुरू केली. सहा लाख रुपये खर्चून त्यांनी दोन सोन्याचे कप बनविले आहेत.

स्वप्नील यांना सोनं (gold) आणि चहा या दाेन गाेष्टी खूप प्रिय आहेत. दोन वर्षापासून त्यांची सामान्य माणसाला सोन्याच्या कपातून चहा द्यावा अशी इच्छा हाेती. त्यांनी ही कल्पना सत्यात उतरवली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Stone Symptoms : पाठदुखी करू नका दुर्लक्षित, असू शकतो किडनी स्टोनचा धोका; डॉक्टरांनी सांगितली ४ गंभीर लक्षणं

कोरड्या त्वचेसाठी सर्वात भारी उपाय! 'दूध-हळदीचा' फेसपॅक

Maharashtra News Live Update: अकोला जिल्ह्यातील पातुर नगरपालिकेवर काँग्रेस- शिवसेना उबाठा आघाडीचे वर्चस्व

Tax free income: कोणकोणत्या कमाईवर सरकार टॅक्स लावत नाही?

ऑपरेशन टायगर फेल? उद्या मातोश्रीवर येतो; ओमराजे निंबाळकरांचा उद्धव ठाकरेंना निरोप?

SCROLL FOR NEXT