जयंत पाटलांच्या कृपेने तटकरे दिल्लीत; माजी आमदारांचं भाकीत Saam TV
महाराष्ट्र

जयंत पाटलांच्या कृपेने तटकरे दिल्लीत; माजी आमदारांचं भाकीत

रायगड जिल्ह्यातील (Raigad District) राजकारण हे आतापर्यत शेकपच्याच मताने चालले आहे.

साम टिव्ही ब्युरो

राजेश भोस्तेकर

रायगड: रायगड जिल्ह्यातील (Raigad District) राजकारण हे आतापर्यत शेकपच्याच मताने चालले आहे. शेकापचे जयंत पाटील (MLA Jayant Patil) यांना सोबत घेतल्याशिवाय कोणालाच राजकारण करता येणार नाही. आगामी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा शेकापच्याच मताने होणार असे भाकितच माजी आमदार पंडित पाटील यांनी केले आहे. आमदार जयंत पाटील यांच्या कृपेनेच सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे दिल्लीत गेले आहेत. मात्र आज लोकार्पण सोहळ्याचे आमंत्रण देऊनही खासदार आणि पालकमंत्री उपस्थित राहिले नाहीत याबाबत पंडित पाटील यांनी भाषणातून नाराजीही व्यक्त केली.

कुर्डुस येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पण सोहळा आज आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते पार पडला. माजी आमदार पंडित पाटील यांनी आपल्या भाषणातून शेकाप शिवाय जिल्ह्यात राजकारण नाही असे भाकीत केले आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शेकाप हा किंगमेकर भूमिका बजावणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केस लवकर वाढवण्यासाठी सकाळी की रात्री तेल कधी लावावे? योग्य वेळ काय?

Maharashtra News Live Update: पुण्यात भर पावसात काँग्रेसचं आंदोलन

Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनाआधी लाडक्या बहिणींना मोठा धक्का! ₹1,500 अचानक बंद? सरकारकडून स्पष्टीकरण

High Blood Pressure : हाय बीपीच्या रुग्णांसाठी कोणती भाजी, फळ अन् पीठ सुपरहेल्दी?

CJP Protest: सत्ताधाऱ्यांमध्ये कुणी पाकिस्तानी आहे का? उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला खोचक टोला

SCROLL FOR NEXT