Tanaji Sawant Son Rishiraj Sawant saamtv
महाराष्ट्र

Tanaji Sawant Son: मुलगा बँकॉकला, पोलीस वेठीला? तानाजी सावंतांच्या मुलाच्या अपहरणाचा बनाव?

Tanaji Sawant Son Rishiraj Sawant: तानाजी सावंतांच्या मुलाचा शोध घेण्यासाठी सगळी पुण्यातली सारी पोलीस यंत्रणा कामाला लागली. मात्र यावरून सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे.

Bharat Mohalkar

सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 2 महिने उलटून गेल्यानंतरही फरार असलेला कृष्णा आंधळे पोलिसांना सापडत नाहीय. मात्र याच पोलिसांनी माजी मंत्री तानाजी सावंतांच्या मुलाला थेट बँकॉकहून दोन तासांत पुण्यात आणलं. नेमका काय घडला होता प्रकार? सावंतांसाठी पोलीस एवढे सतर्क का झाले? त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

राज्याचे माजी मंत्री तानाजी सावंतांचा मुलगा ऋषीराजचं अपहरण झाल्याचा फोन पोलीस कंट्रोल रुमला आला आणि एकच खळबळ उडाली. तानाजी सावंतांच्या मुलाचा शोध घेण्यासाठी सगळी पुण्यातली सारी पोलीस यंत्रणा कामाला लागली.मात्र ऋषीराजने 78 लाख खर्च करुन खासगी चार्टरने मित्रांसोबत बँकॉकसाठी उड्डाण घेतल्याचं समोर आलं. त्यानंतर फोनाफोनी करुन सगळी यंत्रणा वेठीस धरत ऋषीराजचं चार्टर आधी चेन्नई आणि त्यानंतर पुण्याकडे वळवण्यात आलं...हे सगळं प्रकरण काय आहे? पाहूयात.

नेमकं प्रकरण काय?

तानाजी सावंतांचा मुलगा 31 वर्षीय ऋषिराजचं अपहरण झाल्याचा कंट्रोल रुमला फोन

निनावी फोननंतर सिंहगड पोलिसांत अपहरणाची तक्रार

ऋषिराजला पुणे विमानतळावर सोडल्याची ड्रायव्हरकडून सावंतांना माहिती

पोलिसांच्या तपासानंतर ऋषिराज 2 मित्रांसह खासगी चार्टर्ड विमानानं बँकॉकला जात असल्याचं उघड

अंदमान निकोबारपर्यंत पोहोचलेलं विमान पुन्हा चेन्नईमार्गे पुण्याला आणलं

कुटुंबात कुठलाही वाद नसल्याचा दावा तानाजी सावंतांनी केलाय. मात्र तानाजी सावंतांनी घरगुती वादातून सगळी यंत्रणा वेठीस धरल्याचा आरोप ठाकरे गटाने केलाय. हे असं असलं तरी तानाजी सावंतांच्या मोठ्या मुलाने मात्र ऋषिराजच्या बँकॉक ट्रिपचं खरं कारण सांगितलं. तानाजी सावंतांचा मुलगा बँकॉकला मित्रासोबत जात असताना सगळी यंत्रयावर साम टीव्हीने काही सवाल उपस्थित केलेत.

बँकॉक प्रकरणावर सामचे सवाल?

अपहरणाबद्दल निनावी फोन करणाऱ्यास पोलीसांनी अटक केली का?

माजी मंत्र्याने अधिकाऱ्यासोबत बसून पत्रकार परिषद घेणं योग्य आहे का?

मुलगा न सांगता गेला म्हणून यंत्रणा वेठीस धरणं योग्य आहे का?

अपहरणाचा खोटा गुन्हा दाखल केल्यानं सावंतांवर कारवाई होणार का?

एकाखी तक्रार देण्यासाठी सामान्य जनतेला पोलीस स्टेशनमध्ये तासंतास बसवून ठेवलं जातं. मात्र मंत्री आणि नेत्यांच्या मुलांसाठी अख्खी यंत्रणा कामाला लावली जाते.त्यामुळे सर्वसामान्यांसाठी एक आणि सत्ताधाऱ्यांसाठी एक असा कायदा राज्यात आहे का? असा सवाल यानिमित्तानं उपस्थित केला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bacchu Kadu: आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर मस्त ऐश करत आहेत; सुट्ट्या काढून पळाले सगळे – बच्चू कडू संतापले|VIDEO

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची श्री धन्वंतरी रूपात अलंकारिक पूजा

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

SCROLL FOR NEXT