Uddhav Thackeray saam tv
महाराष्ट्र

Thackeray Group News : ठाकरे गटाला नेमकी कोणाची भीती? पदाधिकाऱ्यांना आयफोन वापरण्याच्या सूचनांमुळे खळबळ!

Ambadas Danve : ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली माहिती

माधव सावरगावे, औरंगाबाद

Thackeray Group iPhone News : उद्धव ठाकरे यांनी पक्षातील प्रमुख नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आयफोन वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासंदर्भात ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माहिती दिली आहे. ठाकरेंच्या या निर्णयामुळे आता ठाकरे गटाला कोणाची भीती वाटतेय याची चर्चा सुरू झाली आहे.

ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकारी आणि नेत्यांना आयफोन वापरण्याच्या सूचना करण्यात आल्याच्या बातमीमुळे राज्यात चर्चांना उधाण आले आहे. उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या या सूचनांमुळे ठाकरे गटाचा फक्त आयफोनवरच विश्वास उरला आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गटाला राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून फोन टॅपिंगची भिती वाटत असावी किंवा खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे.

दरम्यान रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन पक्षाकडून करण्यात आल्याचे शिवसेनेच्या काही नेत्यांकडून सांगितले जात आहे. मात्र शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी पक्षाकडून आशा कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत नाहीत असे स्पष्ट केले आहे.

अंबादास दानवे यांनी पुढे बोलताना सांगितले की, सध्याच्या परिस्थितीत ते गरजेचे आहे. व्हिडीओ क्लिप, ऑडिओ क्लिप व्हायरल होत असतात. त्यामुळे सुरक्षतेसाठी प्रमुख लोकांनी आयफोन वापरला पाहिजे अशा सूचना मी जिल्ह्यामध्ये दिल्या आहेत. पण पक्षाकडून अशा कोणत्याही सूचना देण्यात आल्या नाहीत.

दीपक केसरकरांचा ठाकरे गटाला टोला

ठाकरे गटाच्या कार्यकर्यांना आयफोन वापरण्याच्या बातमीवर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे प्रवक्ते शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे. 'आय फोन सहसा कोणाला परवडत नाही, पण ठाकरे गटाचे कार्यकर्ता कदाचित तेवढे श्रीमंत झाले असतील. माझ्या काळात तर सेनेत वडापाव खाऊन प्रचार करणारे कार्यकर्ते होते, आताचे मला माहित नाही' असे केसरकर म्हणाले.

Edited by - Chandrakant Jagtap

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT