बर्ड फ्लूच्या दिल्लीतील प्रादुर्भावामुळे यंत्रणा अलर्ट! लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

बर्ड फ्लूच्या दिल्लीतील प्रादुर्भावामुळे यंत्रणा अलर्ट!

बर्ड फ्लूच्या दिल्लीतील प्रादुर्भावामुळे जालना जिल्हयातील पशुसंवर्धन यंत्रणा अलर्ट झाली आहे. कुक्कुटपालकांमध्ये धास्ती पसरल्याचे चित्र आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना : बर्ड फ्लूच्या दिल्लीतील प्रादुर्भावामुळे जालना जिल्हयातील पशुसंवर्धन यंत्रणा अलर्ट झाली आहे. कुक्कुटपालकांमध्ये धास्ती पसरल्याचे चित्र आहे. कोरोना काळात कुक्कुटपालकांचे अगणित नुकसान झाल्यामुळे यंत्रणा अलर्ट झाली असली, तरी राज्यात कुठेही बर्ड फ्लू आहे की नाही हे तपासणारी यंत्रणा नसल्याने कोंबड्यांचे स्वॅब भोपाळला पाठवावे लागत असल्याने ही यंत्रणा राज्यात कधी कार्यान्वित होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हे देखील पहा -

दिल्लीत बर्ड फ्ल्युमुळे एका पुरुषाला नाहक बळी द्यावा लागलाय. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा आणि पशुसंवर्धन यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. पशुसंवर्धन विभागाने बर्ड फ्लू तपासणीसाठी जिल्ह्यात १६ पथक तयार केले आहेत. हे पथक कोंबड्यांचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेमार्फत भोपाळला पाठवणार आहेत. कारण राज्यात कोंबड्यामध्ये बर्ड फ्लू आहे की नाही हे तपासणारी यंत्रणा महाराष्ट्रात नाही. त्यामुळे घेतलेल्या स्वॅबचा अहवाल यायला उशीर लागतो.

कोरोना काळात कोंबड्या खाल्ल्यामुळे कोरोना होत असल्याची अफवा गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणात पसरली होती. त्यामुळे कुक्कुट पालकांना राज्यात कोट्यवधी रुपयांचा फटका बसला. आता पुन्हा बर्ड फ्लू सारख्या आजाराने तोंड वर काढल्यामुळे पुन्हा पशुपालक चिंतेत आहेत.

राज्यात अनेक वेळा बर्ड फ्लूचा फटका पशुपालकांना बसलाय. पण बर्ड फ्लू आहे की नाही हे तपासणारी यंत्रणा राज्यात नसल्यामुळे पशुपालक आणि पशुसंर्धन यंत्रणा ताटकळत असते. ही यंत्रणा राज्यात निर्माण केल्यास स्वॅबचा अहवाल तातडीने येण्यास मदत होऊन काम सोयीस्कर होईल.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dreams Fact : रात्री पडलेलं स्वप्न सकाळी आठवतच नाही? समोर आलं थक्क करणारं कारण

Mumbai Crime: मुंबई हादरली! ९ वीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, ६ जणांकडून अश्लिल व्हिडीओद्वारे ब्लॅकमेल

Skin Care: चेहरा ड्राय झालाय आणि ओपन पोर्स वाढलेत? मग, चेहऱ्यावर रोज स्प्रे करा हे घरी तयार केलेले फेस मिस्ट

Maharashtra News Live Update: पोलादपुर महाबळेश्वर जोडणारा आंबेनळी घाट 16 ऑगस्ट पर्यंत बंद राहणार

TET Exam Scam: टीईटी पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, नामांकित पोलिस प्रशिक्षण केंद्र चालवणाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT