Raju Shetti, Swabhimani Shetkari Sanghatana News, Raigad saam tv
महाराष्ट्र

Raju Shetti News : राजू शेट्टींची किल्ले रायगडावरुन माेठी घाेषणा; 30 सप्टेंबरपर्यंत शेतक-यांसाठी 'स्वाभिमानी' चे राज्यात माेठं अभियान

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Swabhimani Shetkari Sanghatana News : कृषी दिनाचे (krushi din) औचित्य साधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यात एक जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत शेतकरी जनजागृती अभियान (swabhimani shetkari sanghatana shetkari jan jagruti abhiyan) सुरू करण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात एक जुलैला किल्ले रायगड (Raigad) येथून छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांना अभिवादन करून करण्यात येणार आहे अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे देण्यात आली. (Maharashtra News)

शेतकरी ज्या वेळेला संकटात उभा होता तेव्हा त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहून खऱ्या अर्थाने शेतक-यांना उभ करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. पहिली कर्जमाफी , दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना बी -बियाणे ,अनुदान देणे. गोदामाची कोठारी उभा करणे बैल जोडी , बंधारे , विहीरी , शेती साहित्य यासारख्या वस्तू मोफत वाटणे यामाध्यमातून पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. आजचे राज्यकर्ते मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतात मात्र त्यांच्या कार्याचे अनुकरण करत नाहीत हे दुर्दैव म्हणावे लागेल असे पत्रकात म्हटलं आहे.

आज देशातील व राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. तोट्याची शेती झाल्याने शेतकरी आत्महत्या चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शेतकरी विरोधी धोरणे राज्यकर्ते राबवत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च न निघाल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे.

याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व कार्यकर्ते एक जुलैपासून संपूर्ण राज्यात सर्व पिकांचा उत्पादन खर्च ,मिळणारा भाव व वाढलेल्या महागाईमुळे शेती उत्पादनावर झालेला परिणाम या सर्व गोष्टींची शिवारापासून ते गावातील वाडी वस्तीपर्यंत सभा बैठका घेऊन अभियानाच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे.

यानंतर 30 सप्टेंबर नंतर राज्यामध्ये मोठ्या आंदोलनाची घोषणा करण्यात येणार आहे. याकरिता राज्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व कार्यकर्ते 30 जून रोजी सायंकाळी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचड या ठिकाणी एकत्रित येणार आहेत. एक जुलै रोजी पहाटे सहा वाजता रायगडावरती जाण्यास सुरुवात करून गडावरती पोहोचून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून या अभियानाची सुरुवात करणार आहोत.

या अभियानाच्या पार्श्वभूमीवर आज रायगड इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (raju shetti) यांनी जाऊन संपूर्ण पाहणी केली. एक दिवस आधी येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांची या ठिकाणी राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून दुसऱ्या दिवशी दुपारी सभा झाल्यानंतर सांगता होणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT