swabhimani shetkari sanghatana sandip jagtap says manoj jarange patil shall contest lok sabha election  Saamtv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : मनाेज जरांगेंनी निवडणूक लढवावी, ते संसदेत हवेत; 'स्वाभिमानी'ने स्पष्टच सांगितलं (पाहा व्हिडिओ)

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur :

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (raju shetti) यांच्या प्रमाणे मराठा आंदाेलक मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांनी जालना मतदारसंघातून (jalna lok sabha constituency) लोकसभेची निवडणूक (lok sabha election 2024) लढवावी अशी भावना आज (गुरुवार) स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप (sandeep jagtap) यांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केली. त्यांना स्वाभिमानीचा पाठिंबा राहील असे जगताप यांनी नमूद केले. (Maharashtra News)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप म्हणाले शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आयुष्यभर राजू शेट्टी यांनी ज्या पद्धतीने रस्त्यावरती येऊन संघर्ष केला व संसदेत जाऊन शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यायला सत्ताधाऱ्यांना भाग पाडले.

त्याच पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आणि बहुजन समाजाच्या हितासाठी रस्त्यावरच्या लढाई बरोबर कायदेमंडळात जाऊन मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घ्यायला सरकारला भाग पाडायचे असल्यास त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवायला हवी.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सध्या देण्यात आलेले मराठा आरक्षण सर्वाेच्च न्यायालयात टिकणार नाही हे मनाेज जरांगेंना देखील वाटत आहे. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मनाेज जरांगेंची संसदेत गरज आहे.

जालना मतदार संघातून मनोज जरांगे पाटील हे लोकसभेची निवडणूक स्वतंत्र पणे लढवत असतील तर स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांच्या पाठीशी उभी राहील असेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात! ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

SCROLL FOR NEXT