swabhimani shetkari sanghtana Latest News, Sangli Latest News saam tv
महाराष्ट्र

Sangli: द्राक्ष बागांचे पंचनामे तातडीने करा; 'स्वाभिमानी' ची मागणी

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही कारण पीक विमा योजनेचे निकष कंपनी हिताचे आहेत.

विजय पाटील

सांगली : सांगली (sangli) जिल्ह्यात मांजरडे, हातनुर, जाखापुर, कुचीसह अन्य काही भागात गारपीट झाली आहे. या गारपिटीमुळे छाटणी केलेल्या द्राक्ष बागांच्या काड्याचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी काड्या फुटल्या आहेत. या फुटलेल्या काड्यांना गर्भधारणा होत नाही. गर्भधारणा न झाल्यामुळे द्राक्ष लागत नाहीत. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान होते. त्यामुळे छाटणी झालेल्या द्राक्षबागांवर गारपीट झालेल्या परिसरात पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी त्यासाठी कृषी विभागाला आणि तलाठ्यांना (talathi) तातडीने पंचनाम्याचे आदेश द्यावेत अशी मागणी स्वाभिमानीचे (swabhimani shetkari sanghatana) जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केली आहे. (Swabhimani shetkari sanghtana News Updates)

याशिवाय पलूस येलावी परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या (farmers) द्राक्ष बागेत अद्याप द्राक्षे आहेत. या शेतकऱ्यांचे देखील नुकसान झाले आहे. त्यामुळे अशा द्राक्ष बागांचेही पंचनामे आवश्यक आहे.

तसेच झालेले नुकसान द्राक्ष पीक विमा उतरलेल्या शेतकऱ्यांना मिळत नाही कारण सध्याच्या पीक विमा योजनेचा कालावधी मार्च पर्यंत असतो आणि जरी विमा योजनेच्या आठ महिन्यांच्या कालावधीत द्राक्ष बागेचे नुकसान झाले तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही कारण पीक विमा योजनेचे निकष कंपनी हिताचे आहेत. शेतकरी हिताचे नाहीत त्यामुळे पीक विमा योजना सक्षम करण्याची गरज आहे असे मत महेश खराडे यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई ते नवी मुंबई विमानतळापर्यंत प्रवास जलद होणार; मेट्रो ८ च्या कामाला वेग, गोल्डन मार्गावर किती स्टेशन असणार?

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी

Health warning signs: किडनी आणि लिव्हर खराब झाल्यानंतर शरीरात दिसतात हे बदल; डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती

Pune Summer Tourism: सहलीला जायाचा...! उकाड्यापासून सुटका हवीये? पुण्याजवळची ही 8 थंडगार ठिकाणे पाहाच

Maharashtra Politics: महिला आरक्षण विधेयकाआडून देश तोडण्याचा डाव, उद्धव ठाकरे यांच्याकडून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT