sangli, Swabhimani Shetkari Sanghatana saam tv
महाराष्ट्र

Sangli News : 'ट्रॅक्टरला काडी लावली तर कसं वाटेल'; साता-यापाठाेपाठ सांगलीत 'स्वाभिमानी' आक्रमक

तीन टप्प्यात एफआरपी देण्याचा राज्य शासनाने केलेला कायदा रद्द करा.

विजय पाटील

Swabhimani Shetkari Sanghatana : स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आज आणि उद्या ऊसतोड बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. काही ठिकाणी ऊसतोड सुरू असल्याने ऊसतोड बंद करावी यासाठी सांगली जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गांधीगिरी पद्धतीने आंदाेलन छेडले आहे. (swabhimani shetkari sanghatana latest marathi news)

ऊसदर आणि एफआरपीच्या मागणीसाठी आजपासून (ता. १७) आणि (ता.१८) नोव्हेंबरपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस तोडणी बंद आंदोलन छेडले आहे. या आंदाेलनात शेतक-यांनी सहभागी व्हावे असे आवाहन नुकतेच माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगली येथे केले हाेते.

आज साता-यात (satara) ऊसदरासाठीचे आंदाेलन चिघळण्याच्या मार्गावर आहे. दूसरीकडे सांगली (sangli) जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते गांधीगिरी मार्गाने आंदाेलन करीत आहेत.

सांगली येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे यांनी शेतक-याचा ऊसाने भरलेला ट्रॅक्टर राेखला. त्यानंतर संबंधित ट्रॅक्टरला आंदाेलनाची माहिती आहे की नाही अशी विचारणा केली. शेतक-यांना न्याय मिळावा यासाठी हे आंदाेलन आहे. तातडीने ट्रॅक्टर पुन्हा शेतावर न्या असे शेतक-याला खराडेंनी खडसावले. (Breaking Marathi News)

खराडे म्हणाले एकरकमी एफआरपी मिळाली पाहिजे, तीन टप्प्यात एफआरपी देण्याचा राज्य शासनाने केलेला कायदा रद्द करावा, वजन काटे ऑनलाईन झाले पाहिजेत, रिकव्हरीतील चोरी थांबली पाहिजे, तोडीला द्यावे लागणारे पैसे बंद झाले पाहिजेत आदींसह अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानीने हे आंदोलन पुकारले आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election: भाजपमध्ये गेलेल्या २ अपक्ष नेत्यांची आमदारकी जाणार; काय आहे नियम? PK च्या पक्षाकडून तक्रारीनंतर चर्चेला उधाण

Weight Loss Diet Tips: वजन कमी करण्यासाठी काय खावे आणि काय टाळावे जाणून घ्या

‘५०० कोटीनंतर आणखी ४ बॉम्ब टाकणार’; अनेकांची नावं उघड करणार,मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

5 Crispy Chakli Recipe For Diwali: दिवाळीसाठी बनवा ५ प्रकारच्या खमंग आणि कुरकुरीत चकल्या! वाचा सोप्या रेसिपीज

सिग्नलशी छेडछाड अन् महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये दरोडा! नेमकं काय घडलं? पाहा Special Report

SCROLL FOR NEXT