Chhatrapati Sambhaji Nagar SaamTv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhaji Nagar : निलंबित पोलीस अधिकाऱ्याला महिलेला 'I Love You' म्हणणं पडलं महागात; जमावाने धु..धु.. धुतलं

Crime News : दीड महिन्यातच पुन्हा दारू पिऊन धिंगाणा घालत महिलेची छेड काढली

डॉ. माधव सावरगावे

Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये दारूच्या नशेत मयूरबन कॉलनीत धिंगाणा घालून महिलांची छेड काढल्याप्रकरणी निलंबित असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने दीड महिन्यातच पुन्हा दारू पिऊन धिंगाणा घालत महिलेची छेड काढली. अनिल बोडले, असे गुन्हा दाखल झालेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे.

आधी आय लव्ह यू म्हणून निघून गेलेल्या बोडलेने पुन्हा बुलेटवरून येत थेट महिलेचा हात धरला. हा प्रकार परिसरातील नागरिकांना समजल्यावर त्यांनी बोडलेला बेदम चोप दिला आहे. मंगळवारी (दि. 4) सायंकाळी सहा ते ७ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. (Latest Marathi News)

दीड महिन्यापूर्वीपर्यंत बोडले सातारा (Satara) ठाण्यात कार्यरत होते. सध्या ते निलंबित असल्याचे पोलीस (Police) निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी सांगितले. 17 फेब्रुवारीला त्यांच्याविरुद्ध आधीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अधिक माहितीनुसार, 32 वर्षीय विवाहितेने जवाहरनगर ठाण्यात तक्रार दिली आहे. 4 एप्रिलला सायंकाळी सहा वाजता त्या घरी असताना तेथून जाणाऱ्या अनिल बोडले यांनी त्यांना पाहून आय लव्ह यू असे दोन वेळा म्हटले होते. त्यामुळे पीडिता त्यांच्यावर ओरडल्या होत्या. मात्र, ते तसेच थांबून राहिल्याने पीडितेने घराचा दरवाजा बंद केला. त्यावर ही माहिती त्यांनी पतीला फोन करून दिली.

पती कामात असल्याने त्यांनी आईला तत्काळ घरी पाठविले. काही वेळातच त्या देखील घरी आल्या. दरम्यान, पीडिता दुसऱ्या महिलांशी बोलत उभी असताना आरोपी बोडले बुलेटवरून तेथे आले आणि थेट पीडितेचा हात पकडला. पीडितेने झटका देऊन हात सोडविला. त्यानंतर आठ ते दहा महिला, पुरुषांनी बोडले यांना पकडले आणि बेदम चोप दिला.

तेव्हा बोडले हे नशेत होते, असे पोलिसांनी सांगितले. जमावाकडून मारहाण सुरु असतानाच जवाहरनगर ठाण्यातील पोलीस आले. त्यांनी बोडलेला जमावाच्या तावडीतून सोडविले आणि थेट पोलिसाच्या गाडीतून वैद्यकीय तपासणीसाठी घाटीत नेले. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहायक उपनिरीक्षक सिताराम केदारे करीत आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दिली.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: डोंगराळे येथील लहान मुलीच्या हत्येविरोधात सराफा बाजार बंद

Rabdi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट बनवा हॉटेल स्टाईल टेस्टी रबडी, वाचा सोपी रेसिपी

Mahayuti Dispute: कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांचा पारा चढला,नाराज शिंदेंच्या मंत्र्यांना झापलं

Kalyan : मकोका आरोपीला शिंदे गटाकडून राजकीय आश्रय? भाजप नेत्याच्या आरोपावरुन महायुतीत वादाची ठिणगी

Cinnamon Water Benefits : दालचीनेचे पाणी पिण्याचे फायदे, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT