Sushma Andhare News Saam TV
महाराष्ट्र

Sushma Andhare News: गृहमंत्री रामलल्लाच्या वरचे झालेत का? सुषमा अंधारेंचा भाजपला सवाल

Ruchika Jadhav

Sushma Andhare News:

देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका सुरु आहेत. आज मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या २३० जागांसाठी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजपने चांगलीच कंबर कसलीये. मध्य प्रदेशमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी देखील प्रचारसभा घेतल्या होत्या. याच प्रचारसभेत त्यांनी रामलल्ला दर्शनाबाबत केलेल्या वक्तव्यावरून सुषमा अंधारेंनी भाजपवर जहरी टीका केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गृहमंत्री रामलल्लाच्या वरचे झालेत का? या आधी जनतेने रामलल्लाचे दर्शन केलेच नाही का? अशा शब्दांत सुषमा अंधारेंनी प्रश्न उपस्थित केला आहे. "भारतीय जनतेला स्वत:च्या पैशांनी देवदर्शन करणं कठीण आहे का? ते स्वत:च्या पैशांनी देवदर्शन करू शकत नाहीत का? पण देवाला सुद्धा विक्रीला काढणारे गृहमंत्री आणि पंतप्रधान जर या देशाला मिळाले असतील तर हे सर्वांत मोठं दुर्दैव आहे.",अशा शब्दांत सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) संताप व्यक्त केलाय.

ईडी, सीबीआय, इलेक्शन कमिशनला यांनी अंकित ठेवलं आहे. मग आता रामलल्लाला सुद्धा अंकित ठेवणार का? हे मोठं दुर्दैव आहे असं म्हणत अंधारे यांनी भाजपवर निशाणा साधलाय.

काय म्हणाले अमित शहा

"आम्हाला मतं दिली आणि भाजपचं सरकार आलं तर आयोध्येत रामलल्लाचं मोफत दर्शन दिलं जाईल." अमित शहांच्या याच वक्तव्याने संजय राऊतांनी (Sanjay Raut) देखील त्यांच्यावर टीका केली होती. तसेच आता सुषमा अंधारेंनी भाजपने देव सुद्धा विक्रीला काढले, अशा शब्दांत टीका केली आहे.

बीडमधील जाळपोळ पूर्वनियोजित

मराठा आरक्षण आंदोलनावेळी बीडमध्ये झालेली जाळपोळ पूर्वनियोजित असल्याचा आरोप देखील यावेळी सुषमा अंधारेंनी केला आहे. जे लोक यात सहभागी होते त्यांच्यातील कित्येक जणांच्या हातात वॉकीटॉकी होते. त्यामुळे ही जाळपोळ पूर्वनियोजित होती. आलेले सर्वजण तयारीनुसार आले होते, असंही सुषमा अंधारे यांनी यावेळी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT