Sushma Andhare Saam
महाराष्ट्र

Sushma Andhare: 'प्रसिद्धी मिळवायला त्या रश्मिका मंदाना नाही', सुषमा अंधारेंचा रूपाली चाकणकरांवर हल्लाबोल

Sushma Andhare Slams Rupali Chakankar: चाकणकरांनी, केवळ प्रसिद्धीसाठी आपल्यावर आणि आयोगावर टीका केली जात असल्याचं सांगितलं. यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर देत खोचक टीका केली.

Bhagyashree Kamble

वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठली असून, विरोधकांनी त्यांना धारेवर धरले आहे. चाकणकरांनी, मात्र प्रसिद्धीसाठी आपल्यावर आणि आयोगावर टीका केली जात असल्याचं स्पष्टीकरण दिलं. यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर देत खोचक टीका केली. "रूपाली चाकणकर यांच्यावर बोलून आम्हाला प्रसिद्धी मिळते, त्या काय रश्मिका मंदना आहेत का?" असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला.

मंगळवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुंबईत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. या भेटीनंतर सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यपालांच्या भूमिकेविषयी समाधान व्यक्त केलं. यावेळी त्यांनी, 'मागच्या राज्यपाल महोदयांच्या तुलनेत या राज्यपालांचा नि:पक्षपाती दृष्टीकोन अधिक भावणारा आहे', असं अंधारे यांनी म्हटलं.

चाकणकरांनी प्रसिद्धीसाठी विरोधक आपल्यावर आणि आयोगावर टीका करत असल्याचं सांगितलं होतं. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली. 'रूपाली चाकणकर कोण आहेत? चाकणकर रश्मिका मंदना आहेत की स्मृती इराणी? त्या कोणत्या क्षेत्रातील सुप्रिमो आहेत? राजकारण, बॉलिवूड की प्रशासन, त्या नक्की कशातील सुप्रिम आहेत?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच त्यांच्यावर किंवा त्यांच्याविषयी बोलल्यानं प्रसिद्धी वैगेरे मिळते असं म्हणतात, काही लोकांना फारच मोठे गैरसमज असतात. त्यांनी या अंधश्रद्धेतून लवकर बाहेर यावं. त्यांचे लाडके बंधू सुनील तटकरे यांनी चाकणकरांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करावा, असंही अंधारे म्हणाल्या. यासह चाकणकरांवर बोलायला, आमचं त्यांच्याशी काही देणंघेणं नाही. चाकणकर हा अत्यंत छोटा विषय आहे', असं स्पष्ट विधान सुषमा अंधारेंनी केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: या राशींनी आज कोणताही निर्णय घेताना पक्केपणा ठेवावा, वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update: 'खुर्च्या तोडण्यासाठी नको तर परिवर्तनासाठी नगरपालिका हवी' देवेंद्र फडणवीसांचा शिंदेसेनेला टोला

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT